Nintee Shuts Down: हेल्थटेक स्टार्टअप Nintee ने आपला व्यवसाय बंद केला आहे. याची स्टार्टअपची सुरुवात विंगफायचे संस्थापक पारस चोप्रा यांनी केली होती. पारस चोप्रा यांनी स्वतः व्यवसाय बंद केल्याची माहिती दिली आहे. हा स्टार्टअप फक्त एक वर्षापूर्वीच लॉन्च झाला होता आणि परिस्थिती इतकी खराब झाली की कंपनीला आपला व्यवसाय बंद करावा लागला.
यातली चांगली गोष्ट म्हणजे संस्थापकाने सर्व कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचा पगार दिला आहे, इतर कंपन्या कर्मचाऱ्यांना फक्त 2 महिन्यांचा पगार देतात. एवढेच नाही तर संस्थापकाने सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या दुसऱ्या कंपनीत नोकरीची ऑफरही दिली आहे.
पारस चोप्राने कंपनीच्या वेबसाइटवर ब्लॉग पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी सांगितले आहे की त्यांनी त्यांच्या स्टार्टअपसाठी जमवलेले बरेचसे पैसे अजूनही त्यांच्याकडे सुरक्षित आहेत. येत्या काही आठवड्यांत हे पैसे गुंतवणूकदारांना परत केले जातील, असे ते म्हणाले.
पारस चोप्राने ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे - आमचा अंदाज होता की आम्ही लोकांचे जीवन सुधारण्यासाठी एआयच्या मदतीने एक मोठा व्यवसाय तयार करू. याद्वारे आम्ही खूप कमी लोकांपर्यंत पोहोचू शकलो आणि समजले की हा व्यवसाय वेगाने वाढवणे शक्य नाही.
पारस म्हणाले की, आपल्या सुरुवातीच्या कल्पनेपासून दूर जात कंपनीने आपले व्यवसाय मॉडेल बदलून शिक्षण आणि शिकण्याशी संबंधित कल्पनांवर काम करण्याचा प्रयत्न केला. स्टार्टअप टीमला लवकरच समजले की आजच्या काळात ॲप तयार करणे सोपे नाही. पारस म्हणाले की निन्टी अंतर्गत व्यवसाय उभारण्याचा प्रयत्न करणे हा एक चांगला निर्णय होता.
Ninteeचा व्यवसाय बंद झाल्याचा मोठा परिणाम तेथील कर्मचाऱ्यांवर होणार आहे. मात्र, या कठीण काळात कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना मोठी मदत करत आहे. स्टार्टअपकडून सर्व कर्मचाऱ्यांना 4 महिन्यांचा पगार नुकसानभरपाई म्हणून दिला जात आहे.
इतकेच नाही तर पारसने सर्व कर्मचाऱ्यांना सध्याच्या पगारावर त्याच्या अन्य कंपनी VWO मध्ये काम करण्याची ऑफर दिली आहे. सामान्यत: अशा प्रकरणांमध्ये, कर्मचाऱ्यांना 2 महिने किंवा जास्तीत जास्त 3 महिन्यांचा पगार दिला जातो, परंतु या स्टार्टअपने 4 महिन्यांचा पगार देऊ केला आहे, जे कौतुकास्पद पाऊल आहे.
Nintee ही पारस चोप्राची तिसरी कंपनी आहे. याआधी त्याने VWO आणि Wingify या कंपन्या स्थापन केल्या होत्या. त्याच्या बुटस्ट्रॅप्ड कंपनी विंगीफायने गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण नफा कमावला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये, कंपनीचा ऑपरेशन्समधील महसूल 16.8 टक्क्यांनी वाढून 223 कोटी रुपये झाला, ज्यामध्ये कंपनीने कर भरल्यानंतर 51 कोटी रुपयांचा नफा कमावला.
या वर्षी बंद होणारा Nintee हा पहिला स्टार्टअप नाही. या वर्षाच्या सुरुवातीला, रेसो (इंडिया), रॅरियो, ओकेएक्स (इंडिया), मुविन आणि गोल्डपे यासह अनेक स्टार्टअप्स बंद झाले आहेत. 2023 मध्ये जवळपास 15 स्टार्टअप्सनी त्यांचे व्यवसाय बंद केले होते. व्यवसाय बंद करण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फंडिंग. तर काही स्टार्टअप्सनी इतर आव्हानांमुळे त्यांचे व्यवसायही बंद केले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.