अर्थसंकल्प 2024ची तारीख झाली जाहीर; अर्थमंत्री सीतारामन 'या' दिवशी सादर करणार अंतरिम अर्थसंकल्प

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडतील. अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल अपेक्षित नाहीत. पूर्ण अर्थसंकल्प 2024 एप्रिल-मेमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच सादर केला जाईल.
Budget Session 2024: Nirmala Sitharaman to present Interim Budget on February 1
Budget Session 2024: Nirmala Sitharaman to present Interim Budget on February 1Sakal
Updated on

Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 2024-25 या आर्थिक वर्षासाठी केंद्र सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडतील. अंतरिम अर्थसंकल्पात कोणतेही मोठे धोरणात्मक बदल अपेक्षित नाहीत. पूर्ण अर्थसंकल्प 2024 एप्रिल-मेमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच सादर केला जाईल.

1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार

अंतरिम अर्थसंकल्प 2024 ची तारीख आता जाहीर झाली आहे. अंतरिम अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी संसदेत मांडला जाईल आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारीला अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील.

अर्थमंत्री सीतारामन संसदेत अर्थसंकल्पादरम्यान देशासाठी गेल्या एक वर्षाचा आर्थिक लेखाजोखा कसा होता आणि येत्या आर्थिक वर्षात कोणत्या कामांसाठी किती पैसा लागेल याची माहिती देतील.

अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे 31 जानेवारीला देशाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केला जाणार आहे. अर्थ मंत्रालयाशी संलग्न मुख्य आर्थिक सल्लागार आणि त्यांच्या टीमने तयार केलेला आर्थिक सर्वेक्षण अहवाल 31 जानेवारी रोजी सादर केले जाईल.

अंतरिम अर्थसंकल्पात सरकारला निवडणुकीच्या वर्षात देशाचा खर्च भागवण्यासाठी किती पैसा लागणार आहे आणि तो कसा वापरला जाईल यावर चर्चा होते. याला व्होट ऑन अकाउंट म्हणतात.

Budget Session 2024: Nirmala Sitharaman to present Interim Budget on February 1
Google Layoffs: गुगलचा मोठा निर्णय! 'या' विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ, काय आहे कारण?

देशाची आर्थिक स्थिती सांगणारा दस्तावेज

मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ संपण्याच्या काही महिन्यांपूर्वीच हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी देशाची आर्थिक स्थिती सांगणारा हा अत्यंत महत्त्वाचा दस्तावेज ठरणार आहे.

निवडणुकीच्या वर्षात देशात दोन अर्थसंकल्प सादर केले जातात, त्यापैकी पहिला अर्थसंकल्प विद्यमान सरकार आणि दुसरा अर्थसंकल्प नवीन सरकारच्या स्थापनेनंतर सादर केला जातो.

Budget Session 2024: Nirmala Sitharaman to present Interim Budget on February 1
Polycab Share: पॉलीकॅबचे शेअर्स 22 टक्क्यांनी घसरले; आयकर विभागाने कंपनीवर केले गंभीर आरोप, काय आहे प्रकरण?

अर्थसंकल्पीय अधिवेशन किती दिवस असणार?

संसदेचे पुढील अधिवेशन जे अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, ते 31 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. त्याची सुरुवात 31 जानेवारीला राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने होईल. त्याच दिवशी आर्थिक सर्वेक्षण संसदेत सादर केले जाईल आणि दुसऱ्या दिवशी अंतरिम अर्थसंकल्प 2024 सादर केला जाईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()