Paytm Payments Bank Case: पेटीएम पेमेंट बँकेविरुद्ध फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट (फेमा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेटीएमची कंपनी वन 97 कम्युनिकेशन्सने परकीय चलन नियमांचे उल्लंघन केले आहे का याची अंमलबजावणी संचालनालय चौकशी करत असल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते. (Paytm crisis Case under FEMA initiated against Paytm Payments Bank)
कंपनीची फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्टच्या (FEMA) विशेष तरतुदींअंतर्गत चौकशी केली जात आहे. मिंटच्या अहवालात एका अधिकाऱ्याने सांगितले की, आरबीआयने ग्राहकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे. ईडीने आरबीआयकडून पेटीएमवरील कागदपत्रेही मागवली आहेत. याशिवाय संपूर्ण प्रकरणाचा सखोल अभ्यासही केला जात आहे. विविध एजन्सी या प्रकरणाची चौकशी करत आहेत. (Paytm shares crash after case against payments bank)
आज पेटीएमचा शेअर 10 टक्क्यांनी घसरला
Paytmची मूळ कंपनी One97 Communications Limited च्या शेअर्समध्ये पुन्हा 10 टक्क्यांची घसरण दिसून आली आणि शेअर लोअर सर्किटवर पोहोचला. या घसरणीनंतर पेटीएमच्या शेअर्सने आज 342.15 रुपयांची नीचांकी पातळी गाठली.
गेल्या 10 दिवसांत मार्केट कॅप 26,000 कोटी रुपयांनी झाले कमी
गेल्या 10 दिवसांत पेटीएमच्या शेअरमध्ये 55 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. गेल्या 10 दिवसांच्या घसरणीनंतर पेटीएम शेअर्सचे मार्केट कॅप सुमारे 26,000 कोटी रुपयांनी कमी झाले आहे. पेटीएमच्या शेअर्सच्या या घसरणीमुळे किरकोळ गुंतवणूकदारांपासून ते भारतीय बाजारातील मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत, परदेशी संस्था आणि म्युच्युअल फंडांचे मोठे नुकसान झाले आहे.
पेटीएम पेमेंट बँकेला RBI कडून दिलासा नाहीच
आरबीआयच्या कारवाईनंतर विदेशी ब्रोकरेज फर्म मॅक्वेरीने पेटीएमचे शेअर्स डाउनग्रेड केले आहेत. मॅक्वेरीने पेटीएम शेअर्सला 'अंडरपरफॉर्म' रेटिंग दिले आहे. कंपनीच्या शेअर्सची लक्ष्य किंमत 275 रुपये करण्यात आली आहे. ब्रोकिंग फर्मने पेटीएम शेअर्सची लक्ष्य किंमत 57 टक्क्यांनी कमी केली आहे. तर RBI ने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्यास नकार दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.