Paytm Layoffs: आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएम घेणार मोठा निर्णय; हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची तयारी

Paytm layoffs: पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीतील कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे. किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार याची नेमकी संख्या सांगितली नाही. दोन आठवड्यांत, काही विभागांमधील कर्मचाऱ्यांची संख्या 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सांगितले आहे.
Paytm Layoffs
Paytm LayoffsSakal
Updated on

Paytm layoffs: पेटीएमची मूळ कंपनी वन 97 कम्युनिकेशन्स कंपनीतील कर्मचारी कमी करण्याचा विचार करत आहे. किती कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाणार याची नेमकी संख्या सांगितली नाही. दोन आठवड्यांत, काही विभागांमधील कर्मचाऱ्यांची संख्या 20 टक्क्यांपर्यंत कमी करण्यास सांगितले आहे. (Paytm Layoffs employees part of annual appraisal cycle one 97 communications RBI Action)

पेटीएम कंपनी जवळपास दीड महिन्यापासून अडचणीत असून भारतीय रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट बँकांवर बंदी घातली आहे. सूत्रांच्या हवाल्याने मनीकंट्रोलच्या अहवालात म्हटले आहे की वार्षिक कामगिरीच्या आधारे पेटीएमच्या विविध विभागातील लोकांना कंपनीतून बाहेर काढले जाऊ शकते.

किती लोक त्यांच्या नोकऱ्या गमावतील?

अहवालानुसार, किती लोकांना कामावरून कमी केले जाईल हे अद्याप कळलेले नाही. परंतु काही विभागांच्या व्यवस्थापकांना संघाचा आकार 20 टक्क्यांनी कमी करण्यास सांगितले आहे. अहवालानुसार, दोन आठवड्यांपूर्वी कर्मचारी कपातीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

Paytm Layoffs
Stock Market Crash: शेअर बाजार कोसळल्यानंतर अदानींचे 90,000 कोटी तर अंबानींचे 30,000 कोटी बुडाले

पेटीएमच्या प्रवक्त्याने काय सांगितले?

पेटीएमच्या प्रवक्त्याने कर्मचारी कपातीवर सांगितले आहे की सध्या मूल्यांकनाची वेळ सुरू आहे. अशा स्थितीत कर्मचारी कपात होण्याची शक्यता आहे. याला कपात म्हणू नये, असे त्यांनी सांगितले. कारण ते कामगिरीवर आधारित असेल. आणि प्रत्येक कंपनी ही पद्धत अवलंबते. मात्र, किती कर्मचाऱ्यांची कपात होणार याचा आकडा सांगण्यासही त्यांनी नकार दिला आहे.

कर्मचारी काय म्हणतात?

कंपनीच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले की, टीमची पुनर्रचना करण्याचे व्यवस्थापनाकडून आदेश आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांची संख्या कमी करण्यास सांगितले आहे. एचआरकडून कर्मचाऱ्यांना कपातीची माहिती दिली जात आहे.

Paytm Layoffs
SEBI-NISM Conference : बाजारातील फुगवटा गंभीर नाही; ‘सेबी-एनआयएसएम’ परिषदेत उदय कोटक यांचे प्रतिपादन

यापूर्वी 2023 मध्ये पेटीएमची मूळ कंपनी One 97 Communications ने कर्मचारी खर्च 15 टक्क्यांनी कमी करण्यासाठी कर्मचारी कपातीचा निर्णय घेतला होता. कंपन्यांनी त्यांच्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.

पेटीएमच्या विविध विभागांमधून 1,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले होते. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे दहा टक्के कामगारांना कपातीचा फटका बसला होता.

कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर कामावरून कमी करण्याबद्दल कंपनीच्या प्रवक्त्याने या अगोदर सांगितले होते की, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) सह काम करता येणाऱ्या बहुतांश पदांवर याचा परिणाम होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.