Paytm QR Code: पेटीएम पेमेंट बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर देशभरातील व्यापाऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. कारण पेटीएमचा क्यूआर कोड सर्व दुकानांमध्ये आहे. पण आरबीआयने केलेल्या कारवाईनंतर किराणा व्यापारी पेटीएमचा पर्याय शोधू लागले आहेत. 42 टक्क्यांहून अधिक किराणा स्टोअर्स आधीच BharatPe, PhonePe, GooglePe आणि MobiKwik कडे वळले आहेत.
अशा परिस्थितीत पेटीएमने सांगितले की, घाबरण्याची गरज नाही. पेटीएमचे क्यूआर कोड 29 फेब्रुवारीनंतरही चालू राहतील. पेटीएम व्यापाऱ्यांना दुसरा कोणताही पर्याय शोधण्याची गरज नाही. कंपनीने सांगितले की पेटीएमच्या क्यूआर व्यतिरिक्त, साउंडबॉक्स आणि कार्ड मशीन देखील कोणत्याही अडचणी शिवाय काम करत राहतील.
RBI ने पेमेंट्स बँकेच्या विरोधात 31 जानेवारीला कारवाई केल्यानंतर बाजारातील लोक पेटीएम मशीन आणि क्यूआर कोडवरही संशय घेत आहेत.
पेटीएमने सांगितले की जर व्यापाऱ्याचे खाते पेटीएम पेमेंट्स बँकेत असेल तर ते दुसऱ्या बँकेशी जोडले जाईल. यामुळे क्यूआर कोडद्वारे येणारे त्यांचे पैसे कोणत्याही अडचणीशिवाय येत राहतील. अलीकडेच ॲक्सिस बँकेने पेटीएमसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.
बँकेचे एमडी आणि सीईओ अमिताभ चौधरी म्हणाले की, आरबीआयने मान्यता दिल्यास ॲक्सिस बँक पेटीएमसोबत काम करण्यास तयार आहे. यापूर्वी एचडीएफसी बँकेनेही अशीच इच्छा व्यक्त केली होती.
किराणा व्यापाऱ्यांकडे अनेक पर्याय आहेत
किराणा क्लबचे संस्थापक आणि सीईओ अंशुल गुप्ता म्हणाले, 'किराणा दुकानदारांना फारशी काळजी नाही कारण त्यांच्याकडे पेमेंट सेवेचे पर्याय उपलब्ध आहेत. दुकानदारांनी इतर पेमेंट ॲप्स वापरणे सुरू केले आहे किंवा ते करण्याची योजना आखत आहेत, जेणेकरून कामामध्ये कोणतीही अडचण येणार नाही.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.