मुंबई : पेटीएम आणि ॲक्सिस बँक या आठवड्यात थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायडर होण्यासाठी नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (एनपीसीआय) अर्ज करणार असल्याची माहिती समोर येत आहे. या अर्जाला मान्यता मिळाल्यास पेटीएम आपली यूपीआय सेवा सुरू ठेवू शकते.
सध्या पेटीएम आपली यूपीआय एका बँकेद्वारे पुरवते; परंतु आरबीआयने पेटीएमच्या या बँकेवर बंदी घातली आहे. परिणामी, येत्या १५ मार्चनंतर वापरकर्ते फास्टॅग सारख्या सेवा वापरण्यासाठी वॉलेटमध्ये पैसे जोडू शकणार नाहीत व पेटीएमची युपीआय सेवा बंद होण्याची शक्यता आहे.
या संदर्भात, पेटीएमसाठी एनपीसीआयची मान्यता खूप महत्त्वाची आहे. पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशनने देखील अलीकडेच सांगितले होते की, त्यांनी युपीआय सेवांसाठी ॲक्सिस बँकेसोबत भागीदारी केली आहे. एका अहवालानुसार पेटीएम आणि ॲक्सिस बँक गेल्या काही दिवसांपासून एनपीसीआयकडे याबाबत पत्रव्यवहार करत आहेत.
दरम्यान, फोन पे, गुगल पे हे देखील युपीआय सेवेसाठी थर्ड पार्टी ॲप्लिकेशन वापरतात. त्यातच व्यवहार सुरक्षित व जलदरित्या पूर्ण करण्यासाठी हे ॲप विविध बँकांसह भागीदारी करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.