Personal Loan: पर्सनल लोन झाले महाग! RBIच्या एका निर्णयामुळे बँकाचा निर्णय, तुमच्या कर्जावर परिणाम किती? जाणून घ्या

Interest Rate Hike: जवळपास दीड वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नसला तरी कर्जे महाग होत आहेत. देशात विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर आधीच जास्त आहेत. आता अनेक बँकांनी कर्जावरील व्याज विशेषत: वैयक्तिक कर्जावरील व्याजात वाढ केली आहे.
Personal Loan Interest Rate
Personal Loan Interest RateSakal
Updated on

Interest Rate Hike: जवळपास दीड वर्षात रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कोणताही बदल केला नसला तरी कर्जे महाग होत आहेत. देशात विविध प्रकारच्या कर्जावरील व्याजदर आधीच जास्त आहेत. आता अनेक बँकांनी कर्जावरील व्याज विशेषत: वैयक्तिक कर्जावरील व्याजात वाढ केली आहे.

वैयक्तिक कर्ज महाग करणाऱ्या बँकांमध्ये देशातील सर्वात मोठी बँक एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक इत्यादींचा समावेश आहे.

खाजगी क्षेत्रातील या प्रमुख बँकांनी अलीकडेच वैयक्तिक कर्ज 30 ते 50 बेसिस पॉइंट्सने महाग केले आहे. म्हणजे चार मोठ्या खासगी बँकांची वैयक्तिक कर्जे आता 0.30 ते 0.50 टक्क्यांनी महाग झाली आहेत.

Personal Loan Interest Rate
RBI Action: आरबीआयने 'या' बँकेवर केली मोठी कारवाई; नियमांचे पालन न केल्याबद्दल ठोठावला लाखो रुपयांचा दंड

सर्वात मोठी बँक HDFC बँकेने एप्रिलपासून वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरात 0.40 टक्क्यांनी वाढ केली आहे. आता या बँकेतील वैयक्तिक कर्जावरील व्याज 10.75 टक्क्यांपासून सुरू होते.

ॲक्सिस बँकेने वैयक्तिक कर्जाचा व्याजदर 10.49 टक्क्यांवरून 10.99 टक्के केला आहे. त्याचप्रमाणे ICICI बँकेने व्याजदर 10.50 टक्क्यांवरून 10.80 टक्के आणि कोटक महिंद्रा बँकेने 10.50 टक्क्यांवरून 10.99 टक्के केला आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून व्याजदर सातत्याने कमी होतील, अशी शक्यता वर्तवली जात असताना, व्याजदर कसे वाढत आहेत? हा प्रश्न निर्माण होत आहे. रिझर्व्ह बँकेने दीड वर्षांपूर्वी रेपो दरात शेवटची वाढ केली होती. याचे उत्तरही आरबीआयकडेच आहे. रिझर्व्ह बँकेने केलेल्या नियामक बदलामुळे विविध बँका वैयक्तिक कर्जावरील व्याजदरात वाढ करत आहेत.

Personal Loan Interest Rate
Maharashtra: महाराष्ट्रानं टाकलं पाकिस्तान अन् बांगलादेशला मागे! अजित पवारांनी सादर केलेल्या बजेटनं केला विक्रम

...म्हणून बँका व्याज वाढवत आहेत

रिझर्व्ह बँकेने वैयक्तिक कर्जाच्या बाबतीत रिस्क वेट वाढवलं ​​आहे. पूर्वी वैयक्तिक कर्जासाठी रिस्क वेट दर 100 टक्के होता. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2023 पासून तो 125 टक्के केला आहे.

दुसरीकडे, बँका या नियामक बदलाचा भार स्वतः सहन करत नाहीत आणि ते त्यांच्या ग्राहकांवर लादत आहेत. ज्यामुळे व्याजदर वाढत आहेत. आगामी काळात वैयक्तिक कर्जे आणखी महाग होण्याची भीती असून व्याजदर वाढवणाऱ्या बँकांची यादीही मोठी होऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.