Petroleum Minister Petrol, Diesel Price Today: येत्या काही दिवसांत पेट्रोलच्या किमतीत 5 रुपयांपर्यंत कपात होण्याची शक्यता आहे. तर डिझेल 2 रुपयांनी स्वस्त होऊ शकते. खुद्द पेट्रोलियम मंत्र्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरून हे संकेत दिले आहेत. गेल्या मार्च महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांची कपात झाली होती.
मात्र, सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 71 डॉलरवर दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्याबाबत हरदीप सिंग पुरी यांनी कोणते संकेत दिले आहेत?
हरदीप सिंग पुरी यांनी त्यांच्या एक्स हँडलवर सांगितले की, धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर, तेल कंपन्यांनी पेट्रोल पंप डीलर्सना दिलेल्या भेटवस्तूचे हार्दिक स्वागत. 7 वर्षांपासून सुरू असलेली मागणी पूर्ण झाली आहे.