Supreme Court RBI Governor
Supreme Court RBI GovernorSakal

Supreme Court: आरबीआय गव्हर्नर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल; काय आहे प्रकरण?

Supreme Court RBI Governor: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल झाली आहे. हे प्रकरण कोविड कर्जाशी संबंधीत आहे.
Published on

Supreme Court RBI Governor: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. हे प्रकरण कोविड कर्जाशी संबंधीत आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे पालन न केल्याबद्दल गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या विरोधात ही याचिका दाखल झाली आहे.

कोविड कर्ज स्थगिती कालावधीत बँकांकडून व्याजावर व्याज आकारल्याबद्दल RBI गव्हर्नर विरोधात सुप्रीम कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे. कोविड कर्ज स्थगिती कालावधीत बँकांकडून आकारण्यात आलेल्या व्याजाच्या परताव्याच्या आरबीआयच्या परिपत्रकाबाबत ही अवमान याचिका दाखल करण्यात आली आहे.

7 एप्रिल 2021 रोजी जारी केलेले आरबीआयचं परिपत्रक ‘स्मॉल स्केल इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन विरूद्ध युनियन ऑफ इंडिया‘ या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या 23 मार्च 2021 रोजी दिलेल्या निकालानुसार नाही असं याचिकाकर्त्यांच मत आहे.

Supreme Court RBI Governor
Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास?

स्थगिती कालावधी दरम्यान व्याजावर कोणतेही व्याज, चक्रवाढ व्याज किंवा दंडात्मक व्याज आकारले जाणार नाही असे कोर्टाचे निर्देश होते. मात्र त्याच उल्लंघन RBI कडून झाल्याने ही याचिका दाखल केल्याचं याचिकाकर्त्यांचं मत आहे.

Supreme Court RBI Governor
Bhutan: हॅप्पी कंट्रीमध्ये बिटकॉइनची हवा! भूतान बनला बिटकॉइनचा साठा असलेला जगातील चौथा सर्वात मोठा देश

याचिकाकर्त्यांचा असा युक्तिवाद आहे की आरबीआयने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा चुकीचा उल्लेख केला. ज्याने बँकांना 1 सप्टेंबर 2020 पासून स्थगिती कालावधीत जमा झालेल्या व्याजावर व्याज गोळा करण्याची परवानगी दिली. या प्रकरणात सुप्रीम कोर्ट काय निर्णय देणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.