Government Scheme: मोदी सरकारने दिली आनंदाची बातमी! जुलैमध्ये लोकांच्या बँक खात्यात येणार 2,000 रुपये

ही योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती
PM Kisan Scheme
PM Kisan SchemeSakal
Updated on

PM Kisan Scheme: जुलै महिन्यात देशातील जनतेला एक चांगली बातमी मिळणार आहे. जुलै महिन्यात मोदी सरकार देशवासीयांच्या खात्यात 2,000 रुपये पाठवणार आहे. त्यामुळे देशातील जनतेलाही मोठा दिलासा मिळणार आहे.

हे 2,000 रुपये मोदी सरकार त्या लोकांना पाठवणार आहेत जे पीएम किसान योजनेशी संबंधित आहेत. हे 2,000 रुपये पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्यासाठी पाठवले जातील.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM किसान योजना) च्या 14 व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. पात्र शेतकऱ्यांना लवकरच केंद्राकडून 2,000 रुपयांचा हप्ता मिळेल.

PM किसान योजनेचा 13 वा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आला होता. पीएम किसान योजना ही खासकरून शेतकऱ्यांसाठी चालवली जाणारी योजना आहे. देशातील शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

पीएम किसान 14 वा हप्ता

पीएम किसान योजनेच्या अधिकृत ट्विटर हँडलनुसार, सरकार 27 जुलै 2023 रोजी राजस्थानमधील सीकरमध्ये 14 वा हप्ता जारी केला जाईल.

योजनेंतर्गत, पात्र शेतकऱ्यांना वर्षातून तीन वेळा प्रति हप्ता 2,000 रुपये म्हणजेच वार्षिक 6,000 रुपये मिळतात. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

PM Kisan Scheme
Anil Ambani: फडणवीसांचा अनिल अंबानींना मोठा झटका, भाडेतत्त्वावरील 'ही' 5 विमानतळे घेणार परत

EKYC आवश्यक

त्याच वेळी, पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 14 वा हप्ता मिळविण्यासाठी EKYC अनिवार्य करण्यात आले आहे. 13 वा हप्ता लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे.

परंतु पारदर्शकतेसाठी, विभागाने सर्व शेतकऱ्यांना त्यांचे EKYC करण्यास सांगितले आहे आणि ते योजनेसाठी पात्र असल्याची पुष्टी केली आहे. ही योजना सन 2019 मध्ये सुरू करण्यात आली आणि तेव्हापासून लाखो शेतकरी संबंधित विभागाकडून हप्ते मिळवून या योजनेचा लाभ घेत आहेत.

PM Kisan Scheme
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.