PM Surya Ghar Yojana: PM मोदींनी सुरू केली 'पीएम सूर्य घर' योजना, आता दरमहा मिळणार 300 युनिट मोफत वीज

PM Surya Ghar Yojana 2024: सौरऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच मंगळवारी घोषणा केली की सरकार 'पीएम सूर्य घर: मोफत वीज योजना' सुरू करत आहे. 300 युनिटपर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना वीज देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
PM Modi Announces PM Surya Ghar Muft Bijli Yojana To Boost Solar Power
PM Modi Announces PM Surya Ghar Muft Bijli Yojana To Boost Solar PowerSakal
Updated on

PM Surya Ghar Yojana 2024: सौरऊर्जेला चालना देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच मंगळवारी घोषणा केली की सरकार 'पीएम सूर्य घर मोफत वीज योजना' सुरू करत आहे. 300 युनिटपर्यंत मोफत वीज देऊन एक कोटी घरांना वीज देण्याचे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांनी सोशल मीडिया 'एक्स'वरील पोस्टमध्ये ही घोषणा केली. ते म्हणाले, "शाश्वत विकास आणि लोकांच्या कल्याणासाठी आम्ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सुरू करत आहोत." (Rooftop solar programme announced in Budget named 'PM Surya Ghar: Muft Bijli Yojana')

योजनेचा उद्देश काय आहे?

या प्रकल्पात 75,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार असल्याचे मोदींनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. दरमहा 300 युनिटपर्यंत मोफत वीज देणार असून 1 कोटी घरांना याचा लाभ मिळणार आहे, असेही ते म्हणाले.

मोदी म्हणाले की, योजना तळागाळात लोकप्रिय करण्यासाठी, शहरी स्थानिक संस्था आणि पंचायतींना त्यांच्या अधिकारक्षेत्रात रूफटॉप सोलर सिस्टीमला प्रोत्साहन देण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल.

PM Modi Announces PM Surya Ghar Muft Bijli Yojana To Boost Solar Power
Sebi: गुंतवणूकदारांची होतेय फसवणूक? IPO आणण्यासाठी कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन; काय आहे प्रकरण?

रोजगारालाही चालना मिळेल

या योजनेच्या अंमलबजावणीमुळे लोकांचे उत्पन्न वाढेल, वीज बिल कमी होईल आणि रोजगार निर्मिती होईल, असे पंतप्रधान म्हणाले.

सौरऊर्जा आणि शाश्वत प्रगतीला प्रोत्साहन देण्यासाठी ‘PMSuryaGhar.gov.in’ वर अर्ज करून पंतप्रधानांनी सर्व निवासी ग्राहकांना, विशेषत: तरुणांना PM सूर्या घर मोफत वीज योजना बळकट करण्याचे आवाहन केले. (PM Modi Launches 'PM Surya Ghar Muft Bijli Yojana To Lighten One Crore Homes With Solar Power)

प्रधानमंत्री सूर्योदय योजनेसाठी अर्ज कसा कराल?

- या नवीन योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागेल.

- तुम्ही नोंदणी करताच तुमचे स्वतःचे खाते तयार केले जाईल. तुम्हाला तेथे लॉग इन करावे लागेल आणि वीज ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडी यांसारखी आवश्यक माहिती विचारली जाऊ शकते, जी तुम्हाला अपलोड करून सबमिट करावी लागेल.

- यानंतर तुम्हाला सरकारकडून नोंदणीकृत विक्रेत्यांची यादी मिळेल, जे तुमच्या परिसरात उपलब्ध आहेत.

- यादीतील विक्रेता निवडल्यानंतर, तुमचा अर्ज मंजुरीसाठी डिस्कॉमकडे पोहोचेल.

- डिस्कॉम कडून मंजुरी मिळताच, तुम्ही सोलर प्लांट बसवू शकाल. सोलर प्लांट बसवताच, तुम्हाला प्लांटचा तपशील अधिकृत वेबसाइटवर सबमिट करावा लागेल आणि नेट मीटरसाठी अर्ज करावा लागेल.

- तुम्हाला फक्त पोर्टलद्वारे बँक खात्याचे तपशील आणि रद्द केलेला चेक सबमिट करावा लागेल.

PM Modi Announces PM Surya Ghar Muft Bijli Yojana To Boost Solar Power
Upcoming IPO: कंपनी IPO मधून उभारणार 500 कोटी; सेबीकडे कागदपत्रे सादर, जाणून घ्या संपूर्ण तपशील

योजनेची पात्रता

  • या योजनेचा लाभ फक्त भारतीयांनाच मिळणार आहे.

  • या योजनेसाठी अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 किंवा 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

  • अर्ज करताना सर्व कागदपत्रे बरोबर असणे आवश्यक आहे.

  • अर्जदार कोणत्याही सरकारी सेवेशी संबंधित नसावा.

आवश्यक कागदपत्र काय आहे?

  • आधार कार्ड

  • पत्त्याचा पुरावा

  • वीज बिल

  • उत्पन्न प्रमाणपत्र

  • मोबाईल नंबर

  • बँक पासबुक

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • रेशन कार्ड

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.