केंद्र सरकारकडून देशातील नागरिकांसाठी अनेक योजना राबवल्या जात आहेत. देशातील प्रत्येक घटकासाठी अनेक सरकारी योजना आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मागील वर्षी 17 सप्टेंबर 2023 मध्ये पीएम विश्वकर्मा योजना सुरू केली होती. या योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत.
देशातील 140 हून अधिक जातींच्या लोकांना लाभ देण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली होती. या योजनेद्वारे कारागिरांना कमी व्याजदरात 3 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. या योजनेत 17 हून अधिक कारागीर आणि पारंपरिक कामगारांचा सहभाग आहे.
ही योजना 17 हजार कोटी रुपयांची आहे. लहान शहरांमध्ये गुरू-शिष्य परंपरेनुसार कौशल्यासंबंधीच्या कामात विविध वर्ग गुंतले आहेत. यात सुतार, लोहार, कुंभार, गवंडी, धोबी, फुलकाम करणारे, मासे पकडायचे जाळे विणणारे, कुलपे तयार करणारे, शिल्पकार आदींचा समावेश होतो. या योजनेद्वारे त्यांना पतपुरवठ्याची सुविधा आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्याकरिता मदत केली जाणार आहे.
- विश्वकर्मा योजनेसाठी विश्वकर्मा अंतर्गत येणाऱ्या 140 हून अधिक जातीच्या लोकांचा समावेश आहेत.
-अर्जदाराच्या घरातील इतर सदस्यांपैकी सरकारी नोकरी करणारे नसावे
-अर्जदाराच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती आयकर भरणारा नसावा
विश्वकर्मा योजनेचा उद्देश कौशल्य प्रशिक्षण, तंत्रज्ञान आणि आर्थिक सहाय्य देऊन देशभरातील कारागिरांच्या क्षमता वाढविणे हा आहे. या योजनेंतर्गत कुशल कारागिरांना एमएसएमई म्हणजेच सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांशी जोडले जाणार आहे. त्यामुळे त्यांना खात्रीची आणि मोठी बाजारपेठ मिळू शकेल.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी
अर्जदाराकडे आधार कार्ड
कामगार कार्ड
रेशन कार्ड
मोबाईल क्रमांक
रहिवासी प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल https://pmvishwakarma.gov.in
पीएम विश्वकर्मा योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट दिल्यानंतर, विश्वकर्मा योजना नोंदणीच्या लिंकवर क्लिक करा.
मुख्यपृष्ठावर आल्यानंतर, एक नवीन पृष्ठ उघडेल जिथे तुम्ही तुमचा आधार क्रमांक आणि मोबाइल क्रमांक आणि कॅप्चा कोड सबमिट करा
आता तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर ओटीपी येईल
त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून फिंगरप्रिंट ऑथेंटिकेशन पूर्ण करावे लागेल
आता अर्ज तुमच्या स्क्रीनवर उघडेल
अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा
आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा
शेवटी अर्ज सबमिट करा आणि अर्ज अप्रुव्ह झाल्याचा मॅसेज येईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.