Poonam Pandey Alive: पूनम पांडेच्या निधनाची बातमी काल सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, पण आज 3 फेब्रुवारीला पूनमने स्वत: सांगितले की, मी जिवंत आहे. गर्भाशयाच्या कर्करोगाबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने तीने ही बातमी पसरवली होती. (Poonam Pandey Latest Updates)
खुद्द पूनम पांडेने आता पुढे येऊन ती जिवंत असल्याचा पुरावा दिला आहे. तीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपण जिवंत असल्याची माहिती दिली आहे. (Poonam Pandey Cervical Cancer)
कालपासून पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी ऐकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. मृत्यूच्या वृत्तावर स्पष्टीकरण देताना, पूनम पांडेने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली की, मी जिवंत आहे, मी गर्भाशयाच्या कर्करोगाने मरणार नाही. (Poonam Pandey New Video Viral)
पण खेदाची गोष्ट म्हणजे या आजाराचा सामना कसा करायचा याची माहिती नसल्यामुळे या आजाराने जन्मलेल्या हजारो महिलांचा जीव घेतला आहे. इतर काही कर्करोगांप्रमाणे, गर्भाशयाचा कर्करोग पूर्णपणे टाळता येण्याजोगा आहे. मुख्य गोष्ट म्हणजे HPV लस आणि लवकर तपासणी चाचणी करणे गरजेचे आहे. (Poonam Pandey Latest Marathi News)
पूनम पांडेने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बजेटमधील भाषणाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अर्थमंत्री म्हणत आहेत की, महिला, मुलींच्या लसीकरणावर भर देण्यात आला आहे. गर्भाशय कॅन्सर लसीकरणासाठी 9 ते 14 वयागटातील मुलींचे मोफत लसीकरण केले जात आहे. मुलांच्या संगोपणासाठी आणि गरोदर मातेसाठीच्या अनेक योजना एका छत्राखाली आणण्यात आल्या आहेत.'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.