Stock Market : बाजाराची चौथ्या दिवशीही आगेकूच ; ‘सेन्सेक्स’, ‘निफ्टी’ अर्धा टक्का वधारले

जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी आज सलग चौथ्या दिवशीही तेजी अनुभवली. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ आज अर्धा टक्का वाढले.
Stock Market
Stock Market sakal
Updated on

मुंबई : जागतिक शेअर बाजारातील सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजार निर्देशांकांनी आज सलग चौथ्या दिवशीही तेजी अनुभवली. ‘सेन्सेक्स’ आणि ‘निफ्टी’ आज अर्धा टक्का वाढले. ‘सेन्सेक्स’ ३७६.२६ अंश, तर ‘निफ्टी’ १२९.९५ अंश वाढला.

काही निवडणूकपूर्व सर्वेक्षणात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज दिसल्यामुळे आजही शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. सकाळी व्यवहारांना सुरुवात झाल्यापासूनच शेअर बाजार नफा दाखवीत होते. ‘सेन्सेक्स’ सुरुवातीलाच ७२ हजारांवर उघडला होता;दिवसभरात तो ७२ हजारांच्या खाली गेला नाही. दिवसअखेर ‘सेन्सेक्स’ ७२,४२६.६४ अंशांवर, तर ‘निफ्टी’ २२,०४०.७० अंशांवर स्थिरावला.

Stock Market
Stocks to Watch : 'हा' स्टॉक कमी काळात देईल दमदार परतावा, तुमच्याकडे आहे का ?

ऑईल अँड गॅस क्षेत्र सोडून अन्य सर्व क्षेत्रात आज वाढ दिसून आली. मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकही वाढले. डिफेन्स अॅक्विझिशन कमिटीने ८० हजार कोटी रुपयांच्या संरक्षण साहित्य खरेदीला मंजुरी दिल्यामुळे आज एचएएल, बीईएल या शेअरचे भाव वाढले, तर ब्रिटिश अमेरिकी टोबॅको कंपनीने आयटीसीमधील चार टक्के वाटा विकण्याचा निर्णय घेतल्याच्या बातमीमुळे आयटीसीचा शेअर व्यवहारादरम्यान ४०० रुपयांच्या खाली गेला, तर व्यवस्थापनाने चांगल्या कामगिरीचा अंदाज वर्तवल्यामुळे ग्लेनमार्क फार्मा वाढला.

‘बीएसई’वर पॉवरग्रिड २.३६ टक्के घसरला, स्टेट बँक एक टक्का, रिलायन्स इंडस्ट्रीज पाऊण टक्का, एनटीपीसी अर्धा टक्का घसरला, तर विप्रो पावणेपाच टक्के, महिंद्र आणि महिंद्र चार टक्के वाढला, लार्सन अँड टुब्रो व मारुती अडीच टक्के वाढले, टाटा मोटर दोन टक्के वाढला. इन्फोसिस, इंडसइंड बँक, जेएसडब्ल्यू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, हिंदुस्थान युनिलिव्हर, टायटन, टाटा स्टील या शेअरचे भाव एक ते दीड टक्का वाढले. 

‘निफ्टी’ पुन्हा आपल्या सार्वकालिक उच्चांकाच्या जवळ आला असून, तो पुढील आठवड्यात नवा सार्वकालिक उच्चांक करेल. किंबहुना शेअर बाजारात निवडणूक निकालपूर्व तेजी येण्याचीही शक्यता आहे. 

- सिद्धार्थ खेमका, मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.