Post Office Scheme : पोस्टाच्या या योजनेत मिळतो खात्रीशीर फायदा; तुम्हाला माहितीये का?

महिन्याला १२ हजार रुपये गुंतवा अन् मिळवा लाखोंचा फायदा अशी ही योजना आहे. जाणून घ्या
Post Office Scheme
Post Office Schemeesakal
Updated on

Post Office PPF Scheme In Marathi :

तुम्ही गुंतवणूकीसाठी खात्रीशीर आणि विश्वासू पर्याय शोधत असाल तर पोस्टाच्या या स्कीमविषयी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. यात तुम्ही गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवू शकतात. बाजारात भरपूर गुंतवणूक योजना आहेत ज्या कमी काळात तुम्हाला श्रीमंत करण्याचे दावे करतात.

पण पोस्टाची ही योजना फक्त पैसाच नाही तर विश्वासही देते. पोस्ट ऑफीसची सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) योजना. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही चांगला नफा कमवू शकतात.

या योजनेची खासियत म्हणजे यात केलेली गुंतवणूक अगदी सुरक्षित असते. बाजारातल्या चढ उताराचा त्यावर परिणाम होत नसल्याने तुम्हाला ठराविक रक्कम नक्की मिळते. यावरील व्याजदर सरकार ठरवतात, ज्यांचा त्रैमासिक आधारावर आढावा घेतला जातो. सध्या पोस्ट ऑफिसमध्ये पीपीएफ योजनेवर ७.१ टक्के (वार्षिक) व्याज मिळत आहे.

खाते कुठे उघडावे?

पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) खाते सहज उघडू शकता. हे खाते फक्त ५०० रुपयांपासून उघडा येते. यात तुम्हाला वर्षाला १.५० लाख रुपयांपर्यंत रक्कम जमा करता येईल. या खात्याची मॅच्युरिटी १५ वर्षे आहे. परंतु मॅच्युरिटीनंतर जर तुम्हा पुन्हा हा कालावधी पुढे ढकलायचा असेल तर तुम्ही ते ५-५ वर्ष आणखी वाढवू शकतात.

Post Office Scheme
Saving Scheme For Women : मोदी सरकारने खास महिलांसाठी सुरू केली आहे बचत योजना, तुम्हाला माहितीये?

किती रक्कम जमा करता येईल?

जर तुम्ही पीपीएफ खात्यात दर महिन्याला १२,५०० रुपये जमा केल्या आणि कायम ठेवल्यास तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण ४०.६८ लाख रुपये मिळतील.

यात तुमची एकूण गुंतवणूक २२.५० लाख रुपये असेल तर १८.१८ लाख रुपये तुमचे व्याज उत्पन्न असेल. ही गणणा पुढील १५ वर्षांसाठी वार्षिक ७.१ टक्के व्याजदर गृहित धरून करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.