Post Office Scheme : २१ व्या वर्षी मुलीला मिळतील ७१ लाख, पोस्टाच्या या योजनेत आत्ताच पैसे गुंतवा

Post Office Scheme : पोस्टात पैसे गुंतवणे म्हणजे कुठलाही धोका नसणे होय, त्यामुळे पोस्टावर आजही सर्वांचा भरोसा हाय!
Post Office Scheme
Post Office Schemeesakal
Updated on

 Post Office Scheme For Girls :

आजकाल सर्वच लोक पैसे चांगल्या ठिकाणी गुंतवण्याच्या मागे धावत आहेत. SIP, स्टॉक Investment, Mutual Funds अशा सर्व ठिकाणी पैसे गुंतवताना एक प्रकारची जोखिमही जाणवते. पण, सरकारी गुंतवणुकीचे पर्याय निवडले तर त्यात धोकेही कमी असतात आणि लाभ अधिक होतो. अशीच फायद्याची योजना पोस्ट ऑफिसने आणली आहे.  

पोस्ट ऑफिसने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली आहे. या योजनेते भारताचा रहिवाशी असलेला नागरीक १० वर्षाच्या आतील कन्येसाठी यात पैसे गुंतवू शकतो. सुकन्या समृद्धी योजनेत वर्षाला २५० पासून १ लाख ५० हजार इतकी रक्कम गुतवता येते. (Government Scheme)

Post Office Scheme
Post Office Scheme : पोस्ट ऑफीसची दमदार स्कीम, सुरक्षित परतावा ; शिवाय गरज पडल्यास कर्ज मिळण्याची सोय...

सुकन्या समृद्धी योजना ही अशी योजना आहे जी खरच लाभ देणारी ठरणार आहे. सर्व सरकारी योजनांमध्ये सर्वाधिक व्याज देणारी ही योजना मानली जात आहे. या योजनेत तुम्ही गुंतवत असलेल्या रकमेवर वार्षिक ८.२ टक्के इतके व्याज दिले जाते. या योजनेत तुम्ही काही काळ पैसे गुंतवले तर त्यावरील मिळालेले व्याजासहीत तुमच्या मुलीला २१ व्या वर्षी ७१ लाख इतकी रक्कम मिळेल.

ही योजना काय आहे याबद्दल अधिक जाणून घेऊयात.

आजकाल पोस्ट ऑफिसमध्ये अनेक फायद्याच्या योजना सुरू करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारने मुलींच्या लग्न आणि शिक्षणाचा भार हलका व्हावा यासाठी ही योजना सुरू केली आहे. कोणताही भारतीय नागरिक मुलीसाठी ही योजना सुरू करू शकतो. या योजनेत व्यक्ती १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करू शकतो. त्यानंतर मुलगी २१ वर्षांची झाल्यावर संपूर्ण रक्कम अकाऊंटवर जमा होते.

Post Office Scheme
Post Office Scheme : पोस्ट ऑफीसची दमदार स्कीम, सुरक्षित परतावा ; शिवाय गरज पडल्यास कर्ज मिळण्याची सोय...

या योजनेचे नियम काय आहेत

  • सुकन्या समृद्धी योजनेत रकमेवर दिले जाणारे व्याज हे दर तीन महिन्यांनी सुधारित करते. म्हणजे व्याज वाढवले किंवा कमी केले तर तुम्हाला मिळणाऱ्या अंतिम रकमेवर त्याचा परिणाम होतो.

  • या योजनेत रक्कम गुंतवायला सुरू केल्यानंतर ती दरवर्षी एप्रिल महिन्याच्या ५ तारखेआधी जमा करावी. त्यामुळे या खात्यावर असलेल्या रकमेवर जास्त व्याज मिळू शकते.

  • तुमच्या मुलीचे वय सध्या कितीही असले तरी तिला ही संपूर्ण रक्कम २१ वर्ष पूर्ण झाल्यानंतरच मिळू शकते.

Post Office Scheme
Post Office Scheme : पोस्ट ऑफिसच्या 'या' स्कीममध्ये दर महिना 1,000 रुपयांची गुंतवणूक करा; तयार करा 8 लाखाचा फंड, कसा ते जाणून घ्या?

मुलीला ७१ लाख मिळावेत यासाठी काय करावं लागेल

सरकारच्या या योजनेत तुम्हाला ७१ लाख रूपयांचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्ही वर्षाला दिड लाख रूपये यात जमा करावे. जास्त रकमेवर अधिक व्याज मिळते त्यामुळे हे फायद्याचे राहील.

दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अधिक परतावा मिळावा असे वाटत असेल तर प्रत्येक वर्षी ५ एप्रिलच्या आत तुम्ही प्रत्येक हफ्ता जमा करावा.

तुम्ही १५ वर्षासाठी दिड लाख जमा केले तर १५ वर्षात तुमची रक्कम २२,५०,००० इतकी होईल. आणि त्यावर व्याज मिळून ही रक्कम ७१,८२,११९ इतकी होईल. तुमच्या २२ लाखांवर तब्बल ४९,३२,११९ इतके व्याज मिळेल.

या रकमेवर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही. त्यामुळे जी रक्कम जमा होईल तितकी थेट तुमच्या खात्यात जमा होईल.   

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.