Post Office Time Deposit scheme: बँकांप्रमाणेच पोस्ट ऑफिसमध्येही तुम्हाला वेगवेगळ्या कालावधीसह (Tenure) फिक्स्ड डिपॉझिटचा पर्याय मिळतो. याला पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट असे म्हणतात. तुम्हाला या योजनेतून चांगला नफा मिळवायचा असेल, तर 5 वर्षांच्या एफडीमध्ये गुंतवणूक करा आणि त्याची मुदत वाढवल्यानंतर पुन्हा 5 वर्षांसाठी गुंतवणूक चालू ठेवा. अशा प्रकारे, एकूण 10 वर्षांमध्ये तुम्ही गुंतवणूक करुन जास्त व्याज मिळवू शकता.