Investment Plans: करोडपती व्हायचंय? गुंतवणुकीच्या 'या' तीन गोष्टी करा अन् तुमचे स्वप्न होईल साकार

Investment Plans: तुम्ही जितक्या लवकर बचत सुरू कराल तितके चांगले.
Power of Compounding
Power of CompoundingSakal
Updated on

Power of Compounding: तुमचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी गुंतवणूक ही नेहमीच महत्त्वाची मानली जाते. गुंतवणूक करुन तुम्ही कोणतीही चिंता न करता आर्थिकदृष्ट्या चांगले आयुष्य जगू शकता. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तुम्ही जितक्या लवकर बचत सुरू कराल तितके चांगले. अशा परिस्थितीत नोकरी मिळताच पैशांची बचत करायला सुरुवात करावी.

लवकर गुंतवणूक सुरू करणे

जर तुम्ही पैसे कमवत असाल तर गुंतवणुकीसाठी योग्य वयाची आणि वेळेची वाट पाहू नका. नोकरी सुरू होताच बचत सुरू करा. उदाहरणार्थ, तुम्ही दरमहा 10,000 रुपये गुंतवायला सुरुवात केली आहे.

ज्यावर तुम्हाला 12 टक्के परतावा मिळत आहे. जर तुम्ही वयाच्या 25 व्या वर्षी ही गुंतवणूक सुरू केली तर 60 वर्षापर्यंत तुमची गुंतवणूक 6,43,09,595 रुपये होईल.

तर, जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी गुंतवणूक करायला सुरुवात केली, तर तुमची गुंतवणूक वयाच्या 60 व्या वर्षी 3,49,49,641 रुपये होईल.

Power of Compounding
Chandrayaan-3: चांद्रयान-3 ने चंद्रावर पाऊल ठेवताच, भारताच्या अर्थव्यवस्थेला असा होईल फायदा

पोर्टफोलिओमध्ये विविधता ठेवा

तुम्ही कोणत्याही एका गुंतवणुकीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. तुमच्या गुंतवणूक पोर्टफोलिओमध्ये नेहमी विविधता ठेवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही तरुण गुंतवणूकदार असाल, तर इक्विटीमध्ये पूर्णपणे गुंतवणूक करून राहू नका. तुम्ही सोन्यामध्ये गुंतवणूक करावी.

Power of Compounding
Biggest IPO in 2023: सॉफ्ट बँक आणणार या वर्षीचा सर्वात मोठा IPO, किंमतीसह सर्व माहिती एका क्लिकवर

गुंतवणूक चक्र समजून घ्या

कोणतीही मालमत्ता काही वेळेपर्यंतच परतावा देते. कधी कधी शेअर बाजारात परतावा चांगला असतो तर कधी बँक एफडी देखील व्याजदर वाढल्यावर चांगला परतावा देतात.

त्याच वेळी, कधीकधी गुंतवणूकदारांना रिअल इस्टेटमध्ये चांगल्या संधी मिळतात. या कारणास्तव गुंतवणूकदारांनी नेहमी गुंतवणूक चक्र समजून घेतले पाहिजे. यासाठी तुम्ही आर्थिक सल्लागाराची मदतही घेऊ शकता.

Power of Compounding
7th Pay Commission: 'या' सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आता दोन वर्ष मिळणार पगारी सुट्टी

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.