- ॲड. प्रतिभा देवी, करसल्लागार
प्राप्तिकर कायद्याच्या कलम १६० प्रमाणे पॅनकार्ड अर्थात कायम खाते क्रमांक अतिशय महत्त्वाचा आहे. अनेक सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी पॅनकार्डची आवश्यकता असते. बँकेशी संबंधित; तसेच अन्य आर्थिक व्यवहारांसाठी पॅनकार्ड गरजेचे असते. वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर कोणतीही व्यक्ती स्वतः पॅनकार्डसाठी अर्ज करू शकते. मात्र, अल्पवयीन मुलांचेदेखील पॅनकार्ड काढता येते, ते अनेक बाबतींत फायद्याचे ठरते.
लहान मुलांना पॅनकार्डची गरज
अ) मुलांच्या नावावर गुंतवणूक करताना.
ब) गुंतवणुकीसाठी मुलांना नॉमिनी करताना.
क) मुलांचे बँक खाते उघडायचे असल्यास.
ड) जेव्हा लहान मुले पैसे कमावत असतात.
पॅनकार्ड काढण्याची प्रक्रिया
एखाद्या व्यक्तीने वयाची अठरा वर्षे पूर्ण केल्यानंतर तो स्वतः पॅनकार्डसाठी अर्ज करू शकतो. मात्र अल्पवयीन मुलांचे पॅनकार्ड काढण्यासाठी आई-वडिलांनी अर्ज करावा लागतो. ही प्रक्रिया आता ऑनलाइन करता येते. लहान मुलांचे पॅनकार्ड काढण्यासाठी सर्वप्रथम आई-वडिलांना अर्ज करण्याकरिता ‘एनएसडीएल’च्या वेबसाईटला भेट द्यावी.तिथे पॅनकार्डसाठी असलेला अर्ज भरून, कागदपत्रांची पूर्तता करावी, नंतर शुल्क भरून ही प्रक्रिया पूर्ण करावी. साधारण १५ दिवसांनंतर आपण दिलेल्या पत्त्यावर पॅनकार्ड घरपोच मिळते.
आवश्यक कागदपत्रे
अल्पवयीन मुलांच्या वतीने त्याचे आई-वडील अर्ज करणार असल्याने त्यांच्या ओळखीचा पुरावा दाखवणारी कागदपत्रे, जसे- आधार कार्ड, मतदान कार्ड आदी
मुलाचे आधार कार्ड; तसेच घराच्या पत्त्यासाठी वीजबिल किंवा रेशन कार्ड.
मुलाच्या वयाचे प्रमाणपत्र, पालकांचा फोटो आदी
मुलांच्या पॅनकार्डचे फायदे
मुलांच्या ओळखीचा दस्तावेज उपलब्ध होतो. पॅनकार्ड हे अधिकृत ओळखपत्र आहे. त्यामुळे बँक खाते उघडणे, पासपोर्टसाठी उपयोग होतो. पालकांनी केलेल्या गुंतवणुकीसाठी मुलांचे नामांकन असेल, तर पॅनकार्ड उपयुक्त ठरते. मुलांच्या नावावर गुंतवणूक करण्यासाठी पॅनकार्ड अनिवार्य आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.