विवरणपत्र पूर्वतयारी

करदाते १५ जून २०२३ पासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकतात
Preparation Last date for filing income tax return 31 July 2023
Preparation Last date for filing income tax return 31 July 2023sakal
Updated on

आर्थिक वर्ष २०२२-२३ साठी (आकारणी वर्ष २०२३-२४) प्राप्तिकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. (ज्या प्राप्तिकरदात्यांना लेखापरीक्षण करण्याची गरज नाही, त्यांच्यासाठी) प्राप्तिकर विभागाने आर्थिक वर्ष २०२२-२३ चे प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठीचे अर्ज मे महिन्यात उपलब्ध करून दिली आहे.

मात्र, ‘टीडीएस’ (कापून भरलेला प्राप्तिकर) व ‘टीसीएस’ (गोळा करून भरलेला प्राप्तिकर) यांचे जानेवारी ते मार्च २३ या चौथ्या तिमाहीचे विवरणपत्र ३१ मे २०२३ पर्यंत दाखल केल्यानंतरच, प्राप्तिकर विभागाने विकसित केलेले ‘फॉर्म २६ एएस’, वार्षिक माहितीपत्र (एआयएस), ‘टीआयएस’ अद्ययावत होतात.

Preparation Last date for filing income tax return 31 July 2023
TDS रिफंड : सावधगिरीचा इशारा

करदाते १५ जून २०२३ पासून प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करू शकतात. विवरणपत्र आधी दाखल केले आणि कोणतीही माहिती, उत्पन्न दाखवायचे राहून गेले, तर सुधारित विवरणपत्र भरावे लागेल. करसल्लागारांना सर्वांचे प्राप्तिकर विवरणपत्र वेळेत दाखल करणे हे एक आव्हानच आहे. प्राप्तिकर विवरणपत्र भरण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती, कागदपत्रे आदी करदात्याने नीट गोळा करणे अपेक्षित आहे. त्याची जमवाजमव झाल्यावरच विवरणपत्र दाखल करावे.

Preparation Last date for filing income tax return 31 July 2023
Income Tax: 'या' ६ उत्पन्न स्त्रोतातून कमावलेल्या कमाईवर इन्कम टॅक्सच नाही! काय आहेत नियम?

पूर्वतयारी कशी करावी ?

१) प्राप्तिकरदात्याने मुख्य उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत, ते बघावे; त्याचबरोबर इतर स्रोतांची माहिती, पुरावे, दाखले, कागदपत्र याबाबत सारांश तयार करावा. त्यानुसार प्राप्तिकर विवरणपत्र अर्ज निवडणे सोपे जाईल ( आयटीआर १, २, ३, ४ एस.)

२) विवरणपत्रात खालील माहिती भरणे आवश्‍यक आहे. एका किंवा अधिक चालू खात्यात एक कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा भरणा केल्याची माहिती. परदेशवारीसाठी दोन लाख रुपयांहून अधिक खर्च वीजबिल भरणा एक लाख रुपयांहून अधिक

३) करदात्याने ‘टीडीएस’ (कापून भरलेला प्राप्तिकर) व ‘टीसीएस’ (गोळा करून भरलेला प्राप्तिकर) याचा सारांश तयार करणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर तुमच्याकडची माहिती, कागदपत्रे आदी नवा अद्ययावत अर्ज ‘२६ ए एस’, वार्षिक माहितीपत्र (एआयएस), ‘टीआयएस’ यांचा मेळ बसतो का, याची खात्री करायला हवी.

Preparation Last date for filing income tax return 31 July 2023
Income Certificate : उत्पन्नाचा दाखला पाच वर्षांनी द्यावा लागणार; संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेसाठी अट शिथिल

४) बँकेतील मुदत ठेवीवरील आणि बचत खात्यावरील व्याज, शेअर व म्युच्युअल फंड व्यवहार, भांडवली नफा-तोटा, मिळालेला लाभांश, केलेली गुंतवणूक, वाहन खरेदी, क्रेडिट कार्ड व्यवहार, परदेशात पाठवलेल्या रकमा, मालमत्तेची खरेदी-विक्री (त्यावर कापलेला कर), व्यवसायातील उलाढाल व भरलेला वस्तू व सेवा कर आदी सर्व गोष्टींची माहिती करदात्याने तपासून घेणे अत्यंत आवश्यक आहे. कारण तुमच्यावर प्राप्तिकर विभागाची नजर आहे, हे लक्षात ठेवा.

५) पगारदार व्यक्तींनी आपल्याला मिळालेला ‘फॉर्म १६’ आणि इतर करदात्यांनी आपल्याला मिळालेल्या ‘फॉर्म १६ ए’ची तपासणी करावी. सर्व बँक खात्यांची (१ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ अखेर) संपूर्ण माहिती तपासावी. विवरणपत्रामध्ये मिळालेले र्सव उत्पन्न दाखवणे आवश्यक आहे.

प्राप्तिकरदाता स्वतः विवरणपत्र भरत असेल, तर सर्व माहिती व्यवस्थित भरणे आवश्यक आहे. करसल्लागार विवरणपत्र भरत असेल तर, प्राप्तिकरदात्यांनी सर्व खरी माहिती करसल्लागारांना देणे अपेक्षित आहे, तरच अचूक प्राप्तिकर विवरणपत्र दाखल होऊ शकेल.

(लेखक करसल्लागार आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.