Property Market: येत्या काही वर्षांत अयोध्या, नागपूर, शिर्डीच्या रिअल इस्टेट क्षेत्रात होणार मोठी वाढ; काय आहे कारण?

Property Market: रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कॉलियर्स इंडियाने 100 हून अधिक शहरांपैकी 30 संभाव्य चांगल्या वाढीची शहरे ओळखली आहेत जिथे रिअल इस्टेटची वाढ मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी मजबूत असेल.
real estate sector
real estate sector Saka
Updated on

Property Market: देशातील अयोध्या, वाराणसी, पुरी, द्वारका, शिर्डी, तिरुपती आणि अमृतसर यासह 17 शहरांमध्ये येत्या काही वर्षात रिअल इस्टेट क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. येथील प्रॉपर्टी मार्केटच्या तेजीमागील कारणे म्हणजे आध्यात्मिक पर्यटन, पायाभूत सुविधा प्रकल्प आणि डिजिटलायझेशन.

रिअल इस्टेट कन्सल्टन्सी कॉलियर्स इंडियाने 100 हून अधिक शहरांपैकी 30 संभाव्य चांगल्या वाढीची शहरे ओळखली आहेत जिथे रिअल इस्टेटची वाढ मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी चांगली असेल. या 30 शहरांपैकी, 17 संभाव्य शहरांमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात वाढ होण्याची अपेक्षा आहे.

real estate sector
Maggi Sales In India: भारतीयांना मॅगीचे वेड! कंपनीने 15 महिन्यांत केली 24,000 कोटींची कमाई

ही 17 वेगाने वाढणारी रिअल इस्टेट क्षेत्रे देशाच्या उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि मध्य प्रदेशात समान वाढ दर्शवतात. उत्तर भारतात ओळखली जाणारी शहरे अमृतसर, अयोध्या, जयपूर, कानपूर, लखनौ आणि वाराणसी; पूर्व भारतातील पाटणा आणि पुरी; पश्चिम भारतातील द्वारका, नागपूर, शिर्डी आणि सुरत; दक्षिण भारतातील कोईम्बतूर, कोची, तिरुपती आणि विशाखापट्टणम आणि मध्य भारतात इंदूर.

रिअल इस्टेट कन्सल्टन्सीने सांगितले की, अमृतसर, अयोध्या, द्वारका, पुरी, शिर्डी, तिरुपती आणि वाराणसी ही अध्यात्मिक पर्यटनाच्या वाढीच्या दृष्टीने लक्षात घेण्यासारखी शहरे म्हणून उदयास आली आहेत.

real estate sector
Tata Motors: टाटा मोटर्सची वाहने 'या' महिन्यापासून होणार महाग; कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण

कोलियर्स इंडियाचे सीईओ बादल याज्ञिक यांनी सांगितले की, उत्तम पायाभूत सुविधा, परवडणारी रिअल इस्टेट, कुशल प्रतिभा आणि सरकारी उपक्रम यामुळे लहान शहरे भारताच्या अर्थव्यवस्थेत गतिमान योगदान देणार आहेत. ते म्हणाले की या वाढीसह रिअल इस्टेट क्षेत्र 2030 पर्यंत 1000 अब्ज डॉलर आणि 2050 पर्यंत 5000 अब्ज डॉलर पर्यंत पोहोचेल. जीडीपीमध्ये त्याचा वाटा 14-16 टक्के असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.