Property Demand: गेल्या 10 वर्षांत घरांच्या मागणीत मोठी वाढ, मुंबई- पुण्यापासून देशातील प्रमुख शहरांची स्थिती जाणून घ्या

Property Demand In Major Cities: 2024 च्या पहिल्या सहामाहीत भारतीय रिअल इस्टेट बाजार तेजीत राहिला आहे. घरांची विक्री 1.73 लाख युनिट्सच्या 11 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली. रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रँक यांच्या मते, या कालावधीत देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये कार्यालयीन जागेची मागणी आहे.
Property Demand In Major Cities
Property Demand In Major CitiesSakal
Updated on

Property Demand In Major Cities: 2024 च्या पहिल्या सहामाहीत भारतीय रिअल इस्टेट बाजार तेजीत राहिला आहे. घरांची विक्री 1.73 लाख युनिट्सच्या 11 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली. रिअल इस्टेट सल्लागार नाइट फ्रँक यांच्या मते, या कालावधीत देशातील आठ प्रमुख शहरांमध्ये कार्यालयीन जागेची मागणी आहे.

वार्षिक आधारावर, आठ प्रमुख शहरांमधील घरांची विक्री या वर्षी जानेवारी ते जून या कालावधीत 11 टक्क्यांनी वाढून 1,73,241 युनिट्सवर पोहोचली, तर कार्यालयीन जागेची मागणी 33 टक्क्यांनी वाढून 3.47 कोटी चौरस फूट झाली.

मागणी का वाढली?

नाइट फ्रँक इंडियाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक शिशिर बैजल यांनी सांगितले की, आर्थिक स्थितीत सुधारणा आणि स्थिर सामाजिक-राजकीय परिस्थितीमुळे भारताच्या रिअल इस्टेट बाजाराची झपाट्याने वाढ झाली आहे. निवासी आणि कार्यालयीन जागेची मागणी एका दशकात सर्वाधिक वाढली. 2024 च्या पहिल्या सहामाहीत (जानेवारी-जून) एकूण विक्रीत प्रीमियम घरांचा वाटा 34 टक्के होता.

Property Demand In Major Cities
Income Tax Return: पहिल्यांदाच रिटर्न फाइल करणाऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

कोणत्या शहरात किती मागणी?

  • मुंबईतील निवासी विक्री जानेवारी-जून 2024 मध्ये वार्षिक 16 टक्क्यांनी वाढून 47,259 युनिट्सवर पोहोचली, तर शहरातील कार्यालयीन जागेची मागणी 79 टक्क्यांनी वाढून 58 लाख चौरस फूट झाली.

  • दिल्ली-एनसीआरमधील निवासी विक्री चार टक्क्यांनी घसरून 28,998 युनिट्सवर आली, जरी कार्यालयीन जागेची मागणी 11.5  टक्क्यांनी वाढून 57 लाख चौरस फूट झाली.

Property Demand In Major Cities
Koo Shut Down: भारतीय ट्विटर 'कु'ला लागली घरघर; लवकरच बंद होणार ॲप, काय आहे कारण?
  • बेंगळुरूमध्ये निवासी विक्रीत 27,404 युनिट्सपर्यंत चार टक्के वाढ झाली आहे, तर कार्यालयीन जागेची मागणी 21 टक्क्यांनी वाढून 84 लाख चौरस फूट झाली आहे.

  • पुण्यातील निवासी विक्री 13 टक्क्यांनी वाढून 24,525 युनिट झाली, तर कार्यालयीन जागेची मागणी 88 टक्क्यांनी वाढून 44 लाख चौरस फूट झाली.

  • चेन्नईमध्ये निवासी मागणीत वाढ झाली आणि या काळात कार्यालयीन जागेच्या मागणीत घट झाली. हैदराबाद, कोलकाता आणि अहमदाबादमध्ये निवासी आणि कार्यालयीन जागेच्या मागणीत वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.