Vehicle Loan : वाहनकर्जाच्या मागणीत लक्षणीय वाढ; पुण्यातील ५९ टक्के ग्राहकांची वाहनखरेदीसाठी कर्जाला पसंती

पुण्यातील ५९ टक्के खरेदीदार कर्ज घेऊन मोटार खरेदी करण्याला पसंती देत असल्याचेही निरीक्षण कंपनीने नोंदवले आहे.
Pune Car Loan Demand Surges 59 percent of Customers in Pune Opt for Loans to Buy Cars
Pune Car Loan Demand Surges 59 percent of Customers in Pune Opt for Loans to Buy CarsSakal
Updated on

पुणे : शहरातील वेगाने विकसित होत असलेल्या पायाभूत सुविधा आणि आर्थिक विकासामुळे वैयक्तिक वाहनखरेदीला पसंती वाढत असून, त्यासाठी सुलभ कर्जसुविधा उपलब्ध असल्याने कर्जाची मागणीही वाढल्याचे निरीक्षण ‘कार्स २४’ने आपल्या अहवालात नोंदवले आहे.

पुण्यातील ५९ टक्के खरेदीदार कर्ज घेऊन मोटार खरेदी करण्याला पसंती देत असल्याचेही निरीक्षण कंपनीने नोंदवले आहे. राष्ट्रीय पातळीवर हे प्रमाण ६३ टक्के आहे. कंपनीच्या वाहनांसाठीच्या कर्ज पुरवठा करणाऱ्या ‘कार्स २४’ फायनान्शियल सर्व्हिसेस प्रा. लि. (सीएफएसपीएल) उपकंपनीने ३३६ कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले आहे.

कंपनीने पुण्यात मोटारींच्या कर्जपुरवठा क्षेत्रात वार्षिक ३० टक्के वाढ मिळवली आहे. मोटार आता केवळ चैनीची बाब राहिली नसून, आवश्यकता झाल्याचे या वाढत्या मागणीतून दिसून येत आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

कर्ज घेऊन मोटार खरेदी करणाऱ्या ग्राहकांमध्ये तरुणवर्गाचे प्रमाण सर्वाधिक आहे. मोटारखरेदीसाठी कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचे सरासरी वय ३४ वर्षे असून तरुण नोकरदार आणि कुटुंबांमध्ये वैयक्तिक वाहन खरेदीला वाढती पसंती मिळत आहे.

हा वर्ग प्रवासाचे आवश्यक आणि सुरक्षित साधन म्हणून मोटारीकडे पाहात असून रोजचा प्रवास सुखकर आणि स्वतंत्रपणे करण्यासाठी त्यांना मोटार असणे महत्त्वाचे वाटत आहे. यामुळे सेकंडहँड (प्री-ओन्ड) वाहनांनाही ग्राहकांची वाढती पसंती मिळत असून त्यासाठी कर्ज घेण्याचा पर्याय त्यांना सोपा वाटत आहे.

Pune Car Loan Demand Surges 59 percent of Customers in Pune Opt for Loans to Buy Cars
Car Loan Tips : या गोष्टींचा विचार करा मगच कार लोन घ्या, नंतर पश्चाताप होणार नाही!

बहुतेक कर्जे काही तासांत संमत केली जात असल्यामुळे आणि परतफेडीचे विविध पर्याय उपलब्ध असल्यामुळे देशभरात ‘कार्स २४’ कडे ग्राहकांचा ओघ वाढत आहे. कंपनीकडे रोज ६२० अर्ज येतात, असेही कंपनीने म्हटले आहे.

टिकाऊ व व्यवहार्य वाहनांना अधिक मागणी असून, त्यात वॅगनआर, स्विफ्ट व ह्युंदाई- ग्रँड आयटेन यांचा समावेश आहे. स्पोर्टी डिझाइनसाठी स्विफ्ट लोकप्रिय असून तरुण वर्ग व पहिल्यांदाच मोटार खरेदी करत असलेल्यांची तिला पसंती मिळत आहे. इंधन कार्यक्षमता, उत्तम डिझाइन, कमी देखभाल खर्च, आधुनिक तंत्रज्ञान, रिसेलची चांगली किंमत यामुळे बहुतांश ग्राहकांची ‘हॅचबॅक’ मोटारींना पसंती वाढत असल्याचेही दिसून आले आहे.

Pune Car Loan Demand Surges 59 percent of Customers in Pune Opt for Loans to Buy Cars
Farm Loan : विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना पुन्हा कर्जमाफी? महायुती सरकारकडून हालचाली सुरू

‘कार्स २४’ चे सहसंस्थापक गजेंद्र जान्गिद म्हणाले, ‘‘पुण्यात मोटारखरेदीसाठी वित्तपुरवठ्याला वाढती पसंती मोटारखरेदी सुलभ व वाजवी झाल्याचे दर्शवते. हा कल ग्राहकांची बदलती मानसिकता व वैयक्तिक वाहनखरेदी सोयीस्करपणे करण्यावर असलेला भर याचे निदर्शक आहे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.