जीएसटी इंटेलिजन्स महासंचालनालयाने 2023-24 या आर्थिक वर्षात 2.1 लाख कोटी रुपयांच्या GST चोरीशी संबंधित 6,084 प्रकरणे शोधून काढली आहेत. ही रक्कम 2022-23 मध्ये 4,872 प्रकरणांमध्ये आढळून आलेल्या 1.01 लाख कोटी रुपयांच्या GST चोरीच्या दुप्पट आहे.
तपासादरम्यान, ऑनलाइन गेमिंग, बँकिंग, विमा सेवा आणि धातू व्यापार हे करचुकवेगिरीत सर्वात पुढे असल्याचे समोर आले आहे.
याशिवाय, 2023-24 मध्ये 26,605 कोटी रुपयांचा ऐच्छिक कर भरला गेला आहे, जो 2022-23 मध्ये 20,713 कोटी रुपये होता.