Punjab National Bank Alert: पंजाब नॅशनल बँकेच्या (PNB) करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. PNB ने अशा ग्राहकांना किंवा खातेदारांना पुन्हा अलर्ट जारी केला आहे ज्यांच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही आणि या खात्यांमध्ये शिल्लक शून्य आहे. अशी खाती 30 जून 2024 पासून बंद केली जातील. PNB ने काही दिवसांपूर्वी आपल्या ग्राहकांना त्यांच्या अशा खात्यांचे KYC करून घ्यावे असे कळवले होते. बँकेने 30 जून 2024 पर्यंत मुदत वाढवली आहे. त्यानंतर ही खाती बंद होऊ शकतात.
तुमचे पीएनबी बँकेत बचत खाते असल्यास प्रथम त्याची स्थिती तपासा. PNB या महिन्यापर्यंत अशी खाती बंद करणार आहे. बँकेने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ज्या खात्यांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून कोणताही व्यवहार झालेला नाही. तसेच, ज्यांच्या खात्यात गेल्या तीन वर्षांपासून शून्य रुपये शिल्लक आहे बँक ती खाती बंद करणार आहे. अशा ग्राहकांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. नोटीस पाठवल्यानंतर एक महिन्याने ती खाती बंद केली जातील. तुम्हाला ती खाती ॲक्टिव्ह ठेवायची असतील तर बँकेच्या शाखेत जाऊन लगेच केवायसी करून घ्या.
अनेक स्कॅमर अशा खात्यांचा गैरवापर करतात जे ग्राहक बऱ्याच काळापासून वापरत नाहीत. अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी बँकेने हे मोठे पाऊल उचलले आहे. बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 30 एप्रिल 2024 रोजी खात्याची गणना केली जाईल. पीएनबीने आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, ती सर्व खाती 1 महिन्यानंतर बंद केली जातील.
बँकेने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जर खाते निष्क्रिय झाले आणि ग्राहकांना खाते पुन्हा सक्रिय करायचे असेल, तर अशा ग्राहकांना शाखेत जाऊन केवायसी फॉर्म भरावा लागेल. केवायसी फॉर्मसोबत ग्राहकाला आवश्यक कागदपत्रेही सादर करावी लागतील. त्यानंतर त्यांचे खाते सक्रिय होईल. अधिक माहितीसाठी ग्राहक बँकेला भेट देऊ शकतात.
बँक डिमॅट खाती बंद करणार नाही. म्हणजेच डीमॅट खात्याला हा नियम लागू होणार नाही. बँकेने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की पीएनबी बँक सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय), प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना (पीएमजेजेबीवाय), प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (पीएमएसबीवाय), अटल पेन्शन योजना (एपीवाय) यासारख्या योजनांसाठी खाती उघडण्यात आली आहेत. ती खाती बंद होणार नाहीत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.