Raghuram Rajan: भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर...; रघुराम राजन यांनी दाखवले अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे

Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर तो 6 ते 6.5 टक्क्यांच्या आसपास असू शकतो. 2047 पर्यंत विकसित देश होण्यासाठी, भारताला 9-10 टक्के विकास दराची आवश्यकता असेल, असेही ते म्हणाले.
Raghuram Rajan on actual india's growth rate and rate of inflation
Raghuram Rajan on actual india's growth rate and rate of inflation Sakal
Updated on

Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले की, भारताचा वास्तविक विकास दर 8 ते 8.5 टक्के नाही तर तो 6 ते 6.5 टक्क्यांच्या आसपास असू शकतो. 2047 पर्यंत विकसित देश होण्यासाठी, भारताला 9-10 टक्के विकास दराची आवश्यकता असेल, असेही ते म्हणाले. राजन नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीच्या केलॉग बिझनेस स्कूलमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते. ज्यात भारताचे माजी मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यन देखील होते.

रघुराम राजन म्हणाले, जलद गतीने वाढणाऱ्या देशासाठी, कृषी क्षेत्रातील वाढ ही फसवणूक आहे. लोक कृषी क्षेत्रात नोकऱ्या का शोधत आहेत? त्यात कमी उत्पादकता आहे. त्यांनी इतरत्र नोकऱ्या शोधल्या पाहिजेत.

राजन म्हणाले की, भारताचे श्रमिक बाजार चांगले काम करत नाही, त्यामुळेच देशातील मोठ्या संख्येने लोक सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करतात. राजन म्हणाले की, उत्पादन वाढ ही भांडवल असणाऱ्या क्षेत्रांमध्ये होत आहे, श्रम-केंद्रित क्षेत्रांमध्ये होत नाही.

Raghuram Rajan on actual india's growth rate and rate of inflation
Service Sector: जागतिक सेवा निर्यातीत भारताचा वाटा 18 वर्षांत झाला दुप्पट; 'या' क्षेत्रात सर्वाधिक वाढ

भारतातील दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या विक्रीचे उदाहरण देत राजन यांनी सांगितले की, कोरोना नंतर देशात मागणी पाहिजे तेवढी वाढलेली नाही. चारचाकी वाहनांची विक्री पहा. लोक कोणत्या गाड्या खरेदी करत आहेत. दुचाकी विक्रीकडे लक्ष द्या, मध्यमवर्गीय लोक काय चालवतात. गेल्या काही वर्षात मध्यमवर्गीयांची वाढ सावकाश होत आहे. मध्यमवर्ग कोरोनापूर्वीच्या पातळीपर्यंत पोहोचला नाही.

Raghuram Rajan on actual india's growth rate and rate of inflation
Bank Loan: ग्राहकांना बँकाकडून कर्ज मिळणे होणार अवघड; रेटिंग एजन्सीचा दावा, काय आहे कारण?

राजन म्हणाले की, भारताच्या अर्थव्यवस्थेचे दोन चेहरे आहेत. एक चेहरा म्हणजे चीन प्लस वन पॉलिसी , अॅपल भारतात कारखाने निर्माण करत आहे याबद्दल आपण बोलतो. दुसरा चेहरा म्हणजे मध्यम आणि निम्न मध्यमवर्ग आहे, जो नोकरी शोधत आहे त्याला काम मिळत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.