Raghuram Rajan: 'व्यावसायिकांनी मला धमक्या दिल्या'; RBIचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा दावा

Raghuram Rajan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी (RBI) गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोकरीत त्यांना आलेल्या आव्हानांबद्दल, त्यांनी राबविलेल्या धोरणांबद्दल आणि विवादांबद्दल सांगितले आहे.
Raghuram Rajan
Raghuram RajanSakal

Raghuram Rajan: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी (RBI) गव्हर्नर रघुराम राजन यांनी नोकरीत त्यांना आलेल्या आव्हानांबद्दल, त्यांनी राबविलेल्या धोरणांबद्दल आणि विवादांबद्दल सांगितले आहे. त्यांना बदनाम करण्याच्या प्रयत्नांची कबुली देत ते म्हणाले की, "मला बदनाम करण्यासाठी एक प्रकारची मोहीम राबवली जाते.'' ते पुढे म्हणाले, "हे काही काळापासून सुरू आहे. मी RBIचा गव्हर्नर असतानाही हे सुरु होते.''

आपल्या धोरणात्मक निर्णयांबद्दल बोलताना ते म्हणाले, “आम्ही सुरुवातीला महागाई कमी करण्यासाठी व्याजदर वाढवत होतो आणि ज्यांनी खूप कर्ज घेतले होते त्यांना अचानक भीती वाटू लागली. मला व्यावसायिक लोकांकडून धमक्या आल्या. तुम्ही नीट निर्णय घ्या अन्यथा आम्ही तुम्हाला नोकरीवरुन काढून टाकू.”

Raghuram Rajan
GST: जीएसटी दरामध्ये मोठ्या बदलाची तयारी सुरू; सर्वसामान्यांना फायदा होणार का?

रघुराम राजन यांनी निदर्शनास आणून दिले, “आम्ही बँकिंग क्षेत्र स्वच्छ करण्यास सुरुवात केली आणि लोकांना कर्जाची परतफेड करण्यास भाग पाडले. काही घटक नाराज होते. व्यावसायिक हितसंबंधांचे राजकीय संबंध असतात आणि ते राजकीय संबंध नंतर त्यांच्या हितासाठी शांतपणे किंवा स्पष्टपणे काम करतात. ”

Raghuram Rajan
RBI: रिझर्व्ह बँकेने गुंतवणूकदारांसाठी आणले नवीन ॲप; सहज करता येणार सरकारी रोख्यांची खरेदी-विक्री

भारताच्या अर्थव्यवस्थेतील त्यांच्या योगदानाबद्दल ते म्हणाले, “मी जे केले ते भारतासाठी योग्य होते. UPIची आता खूप भरभराट होत आहे. मला वाटते की मी त्यात एक छोटासा वाटा उचलला आहे.

बँकिंग प्रणालीची आम्ही सुरू केलेली साफसफाई अशा टप्प्यावर पोहोचली आहे जिथे बँकांकडे मोठ्या प्रमाणावर ताळेबंद स्वच्छ आहेत आणि ते कर्ज देऊ शकतात. त्या काळात आम्ही जो विक्रम प्रस्थापित केला त्याबद्दल मला खूप आत्मविश्वास आणि अभिमान वाटतो आणि मला वाटते की गेल्या काही वर्षांत भारताला त्या निर्णयांची मदत झाली.”

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com