''रघुराम राजन यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली अन् काँग्रेसने भ्रष्टाचाराचे दुकान चालवले''

केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा चांगलाच समाचार घेतला.
Raghuram Rajan
Raghuram RajanSakal
Updated on

Raghuram Rajan: केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, राजन यांनी आरबीआय गव्हर्नर पदावर असताना संपूर्ण बँकिंग व्यवस्था उद्ध्वस्त केली होती. राजन अनेकदा मोदी सरकारच्या धोरणांवर टीका करतात.

अलीकडेच त्यांनी मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी पीएलआय योजनेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एका रिसर्च नोटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ही योजना अपयशी होणार आहे.

उत्पादनाला चालना देण्यासाठी आणि देशात रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी सरकारने विविध क्षेत्रांसाठी 1.97 लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेतही राजन सहभागी झाले होते. त्यादरम्यान, राहुल गांधी यांच्या मुलाखतीत त्यांनी दावा केला होता की पुढील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पाच टक्के जीडीपी वाढला तर भारत भाग्यवान असेल.

अलीकडील आकडेवारीनुसार, 2022-23 मध्ये देशाचा GDP वाढ 7.2 टक्के होता. तेव्हापासून रघुराम राजन यांच्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

चंद्रशेखर म्हणाले, ''त्यांना ठरवू द्या की ते अपयशी राजकारणी आहेत की अपयशी अर्थतज्ज्ञ? भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी संपूर्ण बँकिंग व्यवस्था आणि आर्थिक क्षेत्र उद्ध्वस्त केले हे आपल्या सर्वांना माहीत आहे.''

(Raghuram Rajan wrecked entire banking system as RBI governor says Rajeev Chandrasekhar)

Raghuram Rajan
ED Notice: चीनी कंपनीला ईडीची नोटीस, 5,551 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

केंद्रीय मंत्री म्हणाले की काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारने 10 वर्षे भ्रष्टाचाराचे दुकान चालवले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'मोहब्बत की दुकान' या घोषणेची खिल्ली उडवताना चंद्रशेखर यांनी त्यांना परदेशी पर्यटक असे संबोधले.

भाजप मुख्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित करताना इलेक्ट्रॉनिक्स आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री म्हणाले, “तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रगतीच्या दृष्टीने 2004 ते 2014 या कालावधीत पाहिले तर सर्वात योग्य वर्णन म्हणजे भ्रष्टाचाराचे दुकान असे करता येईल.

हा तो काळ होता जेव्हा 2G घोटाळा झाला, Antrix-Devas घोटाळा झाला, गुंतवणूकदार भारत सोडून जात होते आणि BSNL पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते.''

पुढे ते म्हणाले की, "यूपीएचे 2004-2014 हे दशक वाया गेले आहे आणि पंतप्रधान मोदी सत्तेवर आल्यापासून सुरू झालेले दशक हे भारताच्या टेक्नोक्रॅट्सचे दशक आहे. भारत आज जगातील सर्वात वेगवान 5G चा साक्षीदार आहे.''

Raghuram Rajan
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.