Rahul Gandhi Portfolio: राहुल गांधींना शेअर बाजारातून 47 लाखांचा नफा, 'या' चार कंपन्यांच्या शेअर्समध्ये मात्र तोटा

Hindenburg Report: हिंडेनबर्ग अहवालावरून सरकार आणि सेबीवर हल्लाबोल करणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शेअर बाजारातून चांगला नफा कमावला आहे.
Rahul Gandhi Portfolio
Rahul Gandhi PortfolioEsakal
Updated on

हिंडेनबर्ग अहवालावरून सरकार आणि सेबीवर हल्लाबोल करणारे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शेअर बाजारातून चांगला नफा कमावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यांत राहुल यांनी शेअर बाजारात गुंतवणूक करून 46.49 लाख रुपयांचा नफा कमावला आहे. मार्चपर्यंत त्यांनी एकूण 4.33 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी 12 ऑगस्टपर्यंत वाढून 4.80 कोटी रुपये झाली आहे.

राहुल यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या निवडणुकीच्या नामांकनात त्यांनी 15 मार्च 2024 रोजी त्यांच्या पोर्टफोलिओचे मूल्य 4.33 कोटी रुपये असल्याचे सांगितले होते. त्याची किंमत आता 4.80 कोटी रुपये झाली आहे.

राहुल यांनी गुंतवणूक केलेल्या शेअर्समध्ये एशियन पेंट्स, बजाज फायनान्स, दीपक नायट्रेट, डिवीज लॅब्स, जीएमएम फोडलर, हिंदुस्थान युनिलिव्हर, इन्फोसिस, आयटीसी, टीसीएस, टायटन, ट्यूब इन्व्हेस्टमेंट्स आणि एलटीआय माइंडट्री यांचा समावेश आहे.

Rahul Gandhi Portfolio
Hindenburg Report: ''राहुल गांधी फॉरेन एजंट, शेअर मार्केटला अस्थिर करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न''

मोठ्या कंपन्यांशिवाय राहुल गांधींनी छोट्या कंपन्यांच्या शेअर्समध्येही गुंतवणूक केली आहे. यामध्ये व्हर्टोस ॲडव्हर्टायझिंग आणि विनाइल केमिकलसारख्या कंपन्यांचा समावेश आहे. त्याच्या पोर्टफोलिओमध्ये 24 शेअर्स आहेत.

यापैकी एलटीआय माइंडट्री, टायटन, टीसीएस आणि नेस्ले इंडिया या चार कंपन्यांमध्ये त्यांना तोटा झाला आहे. त्यांनी पाच महिन्यांत व्हर्टोसच्या शेअर्सची संख्या वाढवली आहे. यापूर्वी त्यांच्याकडे केवळ 260 शेअर्स होते, ते आता 5,200 पर्यंत वाढले आहेत.

Rahul Gandhi Portfolio
Hindustan Aeronautics : हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड शेअर्स गाठणार आकाशाची उंची, ऐका तज्ज्ञ काय सांगत आहेत ?

"गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे बुडाले तर..."

सेबी प्रमुखांवर हिंडेनबर्ग यांच्या आरोपानंतर आता लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही सरकारवर हल्लाबोल केला आहे.

सेबीच्या अध्यक्षांवरील आरोपांमुळे संस्थेच्या अखंडतेशी गंभीरपणे तडजोड झाली आहे आणि सर्वोच्च न्यायालय या प्रकरणाची पुन्हा स्वत:हून दखल घेईल का, असा सवाल राहुल गांधी यांनी केला.

राहू गांधी म्हणाले की, देशभरातील प्रामाणिक गुंतवणूकदारांचे सरकारसमोर अनेक प्रश्न आहेत, जसे की, सेबीच्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी अद्याप राजीनामा का दिला नाही? गुंतवणूकदारांचे कष्टाचे पैसे बुडाले तर त्याला जबाबदार कोण? पंतप्रधान नरेंद्र मोदी, सेबीचे अध्यक्ष की गौतम अदानी?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.