Success Story: 5 लाखांचे कर्ज घेतले; 'सॉरी मॅडम' नावाने सुरु केले कपड्यांचे दुकान, आज आहे 150 कोटींचा ब्रँड

Raj Nawani Success Story: राज नवानी यांनी फॅशनच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1995 मध्ये त्यांनी 5 लाखांचे कर्ज घेऊन 'सॉरी मॅडम' नावाने कपड्यांचे छोटे दुकान सुरू केले होते. आज त्याचा ब्रँड 'नोस्ट्रम' अनेक बड्या स्टार्सची पसंती बनला आहे.
 Raj Nawani Success Story
Raj Nawani Success StorySakal
Updated on

Raj Nawani Success Story: राज नवानी यांनी फॅशनच्या जगात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 1995 मध्ये त्यांनी 5 लाखांचे कर्ज घेऊन 'सॉरी मॅडम' नावाने कपड्यांचे छोटे दुकान सुरू केले होते. आज त्यांचा ब्रँड 'नोस्ट्रम' अनेक बड्या स्टार्सचा आवडता ब्रँड बनला आहे. राज नवानी यांचा हा प्रवास कसा होता ते जाणून घेऊया.

एका छोट्या दुकानातून केली सुरूवात

मध्य प्रदेशातील दमोह येथील एका छोट्याशा शहरात राज नवानी यांनी छोटे दुकान सुरु केले होते. 1995 मध्ये 'सॉरी मॅडम' नावाच्या छोट्याशा दुकानातून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज बॉलिवूड सेलिब्रिटींच्या फॅशनपर्यंत पोहोचला आहे. 5 लाखांचे कर्ज घेऊन त्यांनी हा व्यवसाय सुरू केला होता.

 Raj Nawani Success Story
Gold All Time High: सोन्याचे भाव विक्रमी उच्चांकावर; रिटर्नच्या बाबातीत सर्व मालमत्ता वर्गांना टाकले मागे

तरुण वयात व्यवसायात केला प्रवेश

बायोलॉजीमध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, वयाच्या 23 व्या वर्षी, राज नवानी यांनी त्यांच्या वडिलांचे कपड्यांचे दुकान 'जय जवान जय किसान' मधून प्रेरणा घेऊन व्यावसायिक जगात प्रवेश केला. त्यांचे 'सॉरी मॅडम' हे दुकान लवकरच शहरात प्रसिद्ध झाले.

आता करोडोंची उलाढाल

कठोर परिश्रम आणि दूरदृष्टीने राज नावानी यांनी आपल्या छोट्याशा दुकानाचे 'नॉस्ट्रम फॅशन प्रायव्हेट लिमिटेड' नावाच्या मोठ्या कंपनीत रूपांतर केले. 2023-24 या आर्थिक वर्षात त्यांच्या कंपनीची उलाढाल 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती.

आता येत्या दोन वर्षांत कंपनी 500 कोटींवर नेण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. 250 हून अधिक लोकांना रोजगार देणारी ही कंपनी सतत प्रगती करत आहे.

 Raj Nawani Success Story
Hinduja Group: 9 महिने तपास, 2,500 कोटींची करचोरी! हिंदुजा ग्रुप आयकर विभागाच्या रडारवर; नेमकं प्रकरण काय?

हा ब्रँड हजारो आउटलेटमध्ये उपलब्ध आहे

'नोस्ट्रम' ब्रँड आज देशभरात 1,500 हून अधिक मल्टी-ब्रँड आउटलेट्स आणि 100 हून अधिक शॉप-इन-शॉप (SiS) ठिकाणी उपलब्ध आहे. राज नवानी यांचा हा संघर्ष फॅशन जगतात आपला ठसा उमटवू इच्छिणाऱ्या सर्व नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.