Advance Salary: आता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार अ‍ॅडव्हान्स पगार, देशात पहिल्यांदाच लागू होणार 'ही' पद्धत

सरकारी कर्मचाऱ्यांना आता अ‍ॅडव्हान्स पगाराचा लाभ घेता येणार आहे.
Advance Salary for Govt Employees
Advance Salary for Govt EmployeesSakal
Updated on

Advance Salary for Govt Employees: सरकारी कर्मचाऱ्यांना आता अ‍ॅडव्हान्स पगाराचा लाभ घेता येणार आहे. देशात प्रथमच ही पद्धत लागू करण्यात आली आहे. राजस्थान सरकारने आगाऊ पगाराची घोषणा केली आहे.

अशोक गेहलोत सरकारने कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि पदोन्नती वाढवल्यानंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

1 जूनपासून नवीन पद्धत लागू करण्यात आली आहे. नवीन पद्धत लागू करणारे राजस्थान हे पहिले राज्य ठरले आहे, याआधी देशातील कोणत्याही राज्याने सरकारी कर्मचाऱ्यांना आगाऊ पगार देऊ केले नव्हते. या व्यवस्थेअंतर्गत राज्य कर्मचारी त्यांच्या पगारातील अर्धा भाग आगाऊ घेऊ शकतील.

20,000 रुपये अ‍ॅडव्हान्स घेऊ शकणार:

राजस्थान सरकारने म्हटले आहे की या अंतर्गत एकावेळी जास्तीत जास्त 20,000 रुपये घेता येणार आहेत. सरकारी कर्मचाऱ्यांना लाभ देण्यासाठी वित्त विभागाने बिगर बँकिंग वित्त कंपनीशी करार केला असून आगामी काळात आणखी काही बँका आणि वित्तीय संस्थांसोबत करार केला जाणार आहे.

जर कर्मचाऱ्याने कोणत्याही महिन्याच्या 21 तारखेपूर्वी त्याचा पगार काढला तर, चालू महिन्याच्या पगारातून पगार कापला जाईल. याव्यतिरिक्त, कर्मचार्‍यांनी काढलेल्या आगाऊ पगारावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, परंतु बँका संबंधित व्यवहारांवर शुल्क आकारू शकतात.

Advance Salary for Govt Employees
Adani Group: ''मोदी सरकार सत्तेत असो किंवा नसो' अदानींच्या कंपन्यांवर...'' राजीव जैन यांचा मोठा दावा

आगाऊ पगार कसा मिळवायचा?

आगाऊ वेतन योजनेचा लाभ घेण्यासाठी, राजस्थान सरकारी कर्मचार्‍यांना त्यांच्या SSO ID वापरून IFMS 3.0 सह स्वतःची नोंदणी करावी लागेल.

राजस्थान सरकारी कर्मचारी त्यांच्या आर्थिक सेवा देणाऱ्या वेबसाइटला भेट देऊ शकतात आणि ऑनलाइन पोर्टलवर त्यांचे हमीपत्र सबमिट करू शकतात. यानंतर कर्मचाऱ्यांना IFMS वेबसाइटवर परत जावे लागेल आणि वन टाइम पासवर्ड (OTP) द्वारे संमती द्यावी लागेल.

Advance Salary for Govt Employees
Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.