Raksha Bandhan 2023: रक्षाबंधन हा भारतातील महत्त्वाचा सण आहे. या महत्त्वाच्या प्रसंगी, बहिण आपल्या भावाला 'राखी' नावाचा पवित्र धागा बांधते आणि त्या बदल्यात भाऊ आपल्या बहिणीला भेटवस्तू देतो. ज्यात रोख रक्कम, दागिने, स्मार्टफोन, सौंदर्य उत्पादने, कपडे, काहीही असू शकते. भेटवस्तू देणे हा रक्षाबंधनाचा पारंपारिक भाग आहे.
आज आम्ही तुम्हाला अशाच काही भेटवस्तूंबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या बहिणीला आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवतील आणि गरजेच्या वेळी तिला मदत करतील.
म्युच्युअल फंड एसआयपी
म्युच्युअल फंडामध्ये पद्धतशीरपणे गुंतवणूक करण्याचा SIP हा एक चांगला पर्याय आहे. तज्ञांच्या मते एसआयपी हे आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक महत्त्वाचे साधन आहे.
जर भावाने बहिणीसाठी म्युच्युअल फंड SIP सुरू केला आणि तो भेट म्हणून दिला, तर ती SIP बहिणीला येणाऱ्या काळात आर्थिकदृष्ट्या मदत करू शकते.
आरोग्य विमा पॉलिसी
सध्या आरोग्य विमा किती महत्त्वाचा झाला आहे, कोविडच्या काळात आणि नंतरही, देशातील जनतेने याचा खूप गांभीर्याने विचार केला आहे आणि त्याची अंमलबजावणीही केली आहे.
तुम्हाला तुमच्या बहिणीला कोणत्याही प्रकारच्या वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत आर्थिकदृष्ट्या सुरक्षित ठेवायचे असेल, तर तुम्ही तिला आरोग्य विमा पॉलिसी भेट देऊ शकता. जेणेकरून तुमच्या बहिणीला वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये.
डिजिटल सोने
रक्षाबंधनाच्या दिवशी अनेक भाऊ आपल्या बहिणींना सोन्याचे दागिने भेट देतात. याशिवाय, तुम्ही दुसर्या पर्यायाचा विचार करु शकता आणि ते म्हणजे डिजिटल सोने. याचे देखील भौतिक सोन्यासारखे अनेक फायदे आहेत आणि ते हाताळण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या लॉकरची आवश्यकता नाही.
ETF सोने
कागदी सोन्यात ईटीएफ किंवा गोल्ड सेव्हिंग अकाऊंटद्वारे गुंतवणूक केली जाते. जे तुम्ही तुमच्या बहिणीला रक्षाबंधनाच्या दिवशी गिफ्ट करू शकता. हे देखील शेअर बाजारात गुंतवणूक करण्यासारखे आहे, परंतु यामध्ये तुम्ही सोन्यात गुंतवणूक करा.
स्टॉक
स्टॉक गिफ्टिंग हा देखील चांगला पर्याय असू शकतो. दीर्घकालीन गुंतवणुकीवर लक्ष केंद्रित करणार्या ब्लू चिप कंपन्यांचे स्टॉक तुम्ही गिफ्ट करू शकता. जे आगामी काळात चांगला परतावा देतील.
नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.