Ram Mandir: अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. अयोध्येच्या राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्याची तारीख 22 जानेवारी 2024 निश्चित करण्यात आली आहे. रिअल इस्टेट ब्रोकर्स म्हणतात की, देशभरातील आणि परदेशातील अनेक गुंतवणूकदार प्लॉट शोधत आहेत. जमिनीचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी चार ते पाच वर्षांपूर्वीच्या किंमती आता दहा पटीने वाढल्या आहेत.
ब्रोकर्स म्हणाले की, रिअल इस्टेटमधील तेजीने देशभरातील गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. यामध्ये मुख्यतः ज्येष्ठ नागरिक किंवा परदेशात राहणारे भारतीय समाविष्ट आहेत, ज्यांना अयोध्येत त्यांचे दुसरे घर किंवा मालमत्ता खरेदी करायची आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या वृत्तानुसार, ANAROCK समुहाचे अध्यक्ष अनुज पुरी म्हणाले, "सर्वोच्च न्यायालयाने 2019 मध्ये राम मंदिराचा बहुप्रतिक्षित निर्णय जाहीर केल्यापासून, अयोध्येतील रिअल इस्टेटची मागणी लक्षणीय वाढली आहे. केवळ स्थानिक लोकांकडूनच नाही तर बाहेरूनही व्यवसायिकांसह गुंतवणूकदारांकडूनही मागणी वाढत आहे.
कायदेशीर तज्ञांचे म्हणणे आहे की संभाव्य खरेदीदारांनी अयोध्येतील मालमत्तेची मालकी, दस्तऐवजांची छाननी केली पाहिजे जेणेकरून जमीन किंवा मालमत्तेवरुन पुन्हा वाद होणार नाहीत.
मालमत्तेच्या किंमती
2019 मध्ये मालमत्तेच्या किंमती सुमारे 25-30% वाढल्याचा अंदाज आहे. ANAROCK संशोधननुसार 2019 मध्ये निर्णयानंतर, बाहेरील भागात (फैजाबाद रोडवरील) जमिनीच्या किंमती प्रति चौरस फूट रुपये 400-700 ने वाढल्या होत्या. या कालावधीत शहराच्या हद्दीतील सरासरी किंमती रुपये 1,000-2,000 प्रति चौरस फूट दरम्यान आहेत.
अयोध्येत मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी लक्षात ठेवा
संभाव्य घर खरेदीदारांनी स्थानिक कायदे आणि नियम तपासले पाहिजेत. अयोध्येचे ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व लक्षात घेता, काही विशिष्ट भागात बांधकाम किंवा विकास कार्यांवर काही निर्बंध असू शकतात, हे देखील लक्षात ठेवले पाहिजे.
पायाभूत सुविधा
तुम्हाला ज्या क्षेत्रात गुंतवणूक करायची आहे, तेथील पायाभूत सुविधांची स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी, पाणीपुरवठा, वीज आणि सांडपाणी व्यवस्था यासारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता तपासणे आणि सध्याच्या पायाभूत सुविधा तुमच्या गरजा पूर्ण करतात की नाही हे देखील तपासणे महत्त्वाचे आहे.
भविष्यातील विकास योजना
कोणत्याही पायाभूत सुविधा/प्रस्तावित विकास प्रकल्प किंवा नियोजन आणि विकास नियमांमधील बदल समजून घेण्यासाठी शहराच्या प्लॅनचे तपशीलवार निरीक्षण करणे देखील आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, संभाव्य खरेदीदारांना स्थानिक नियमांमधील प्रस्तावित बदलांची माहिती असली पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.