Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या उद्‌घाटन सोहळ्यामुळे फटाके बाजारात मोठी उलाढाल

राम मंदिराच्या उद्‌घाटन सोहळ्यामुळे फटाका बाजारात पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला
ram mandir inauguration firecrackers business big turnover
ram mandir inauguration firecrackers business big turnoveresakal
Updated on

चेन्नई : सगळा देश अयोध्येत २२ जानेवारी रोजी होत असलेल्या राममंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी सज्ज होत असून, या दिवशी दिवाळी साजरी करण्याची तयारी केली जात आहे. त्यामुळे फटाक्यांची मागणी दिवाळीपेक्षा अधिक होईल, अशी अपेक्षा ‘ऑल इंडिया फायर वर्क्स ट्रेडर्स असोसिएशन’ने व्यक्त केली आहे.

तमिळनाडूतील प्रसिद्ध शिवकाशीतील फटाके उत्पादकांची संघटना ‘शिवकाशी फायर वर्क्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने (एसएफएमए) दिलेल्या माहितीनुसार, केवळ अयोध्येत २५० कोटी रुपयांचा फटाके बाजार सज्ज असून, देशभरात सुमारे ४०० कोटी रुपयांचे फटाके विकले जाण्याची शक्यता आहे.

‘एसएफएमए’चे पदाधिकारी संजय मुरुगन यांनी सांगितले की, फटाक्यांवरील प्रतिबंधामुळे दिवाळीत फटाका बाजार थंड होता. आता राम मंदिराच्या उद्‌घाटन सोहळ्यामुळे फटाका बाजारात पुन्हा एकदा उत्साह निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ उत्तर भारतातून फटाक्यांची मागणी २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. तथापि, तामिळनाडूमध्ये नुकताच झालेला पाऊस आणि चक्रीवादळ याचा परिणाम उत्पादनावर झाल्याचे शिवकाशीतील उत्पादकांनी म्हटले आहे.

शिवकाशीमध्ये देशातील एकूण फटाके निर्मितीपैकी ९० टक्क्यांहून अधिक उत्पादन होते. सुमारे तीन लाख लोकांना प्रत्यक्ष आणि पाच लाख लोकांना अप्रत्यक्षपणे रोजगार मिळतो. शिवकाशीचा समावेश असलेल्या विरुधुनगर जिल्ह्यात ११७५ फटाके उत्पादक आहेत. पावसामुळे येथे ४० टक्के क्षमतेने उत्पादन सुरू आहे.

फटाके फुटणार ४०० कोटींचे

  • अयोध्येत २५० कोटींचा फटाके बाजार सज्ज

  • उर्वरित देशात १५० कोटींची विक्रीची शक्यता

  • उत्तर भारतात फटाक्यांच्या मागणीत वाढ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.