Ayodhya Ram Mandir: अयोध्येत २२ जानेवारी होणाऱ्या श्री राम मंदिराच्या उद्घाटनामुळे देशात ५० हजार कोटी रुपयांचा व्यवसाय होईल, असा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (सीएआयटी) व्यक्त केला आहे.
‘सीएआयटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतिया व सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २२ जानेवारी हा दिवस ‘राम राज्य दिवस’ म्हणून घोषित करण्याची विनंती केली आहे.
श्री राम मंदिराच्या उद्घाटनाचा दिन हा प्रत्येक दृष्टीने ऐतिहासिक असेल. देशभरात सर्वत्र उत्साह असून, लोक राम मंदिराशी संबंधित उत्पादने मोठ्या प्रमाणात खरेदी करतील.
या अतिरिक्त व्यापाराची मागणी पूर्ण करण्यासाठी सर्व राज्यांतील व्यापाऱ्यांनी तयारी केली असून, व्यापारी संघटना व व्यावसायिकांच्या समन्वयाची जबाबदारीही संघटनेने घेतली असल्याचे खंडेलवाल यांनी सांगितले.
(Ram Mandir to generate trade worth Rs 50,000 crore in January 2024, says CAIT)
विश्व हिंदू परिषदेच्या आवाहनानुसार, एक जानेवारीपासून देशभरात श्री राम मंदिराच्या उद्घाटनासाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर, देशभरातील बाजारपेठांमध्ये कुर्ते, टी-शर्ट, माळा, लॉकेट, की चेन, चित्रे, राम मंदिराचे मॉडेल, श्री राम ध्वजा आदी विविध उत्पादने मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत.
सध्या बाजारात हार्डबोर्ड, पाइनवूड आदीपासून तयार केलेल्या राम मंदिराच्या मॉडेलला मोठी मागणी असून, यातून मोठ्या प्रमाणात महिलांना रोजगार मिळत आहे. सर्व राज्यांमध्ये स्थानिक कारागीर, कलाकार, कुशल, अकुशल कामगारांना रोजगाराची संधी मिळत आहे. देशात नवे रोजगार व व्यवसायाच्या संधी निर्माण होत आहे, असेही त्यांनी सांगितले.
देशभरात दिवाळी
देशभरात २२ जानेवारी रोजी दिवाळी साजरी करण्याचे आवाहन लक्षात घेता मातीचे दिवे, रांगोळी काढण्यासाठी विविध रंग, फुले आणि विद्युत रोषणाईसाठी लागणाऱ्या वस्तूंना मोठी मागणी असल्याचे व्यापारी संघटनेच्या ज्येष्ठ सदस्यांनी सांगितले.
सेवा क्षेत्रालादेखील मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे. देशभरातील होर्डिंग, पोस्टर, बॅनर, पत्रके, स्टिकर आदी जाहिरात साहित्य निर्मात्यांनीदेखील भरीव व्यवसायासाठी पूर्ण तयारी केली आहे. देशभरात श्री राम मंदिराशी संबंधित मोठ्या प्रमाणात गाणी रचली जात आहेत. त्यामुळे संगीत व्यवसायाशी संबंधित लोकांनाही मागणी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.