Ratan Tata: 1,800 कोटींची कंपनी फक्त 90 कोटींना विकली, रतन टाटांचही बिघडलं गणित

भाड्याने फ्लॅट किंवा घर देणाऱ्या बेंगळुर स्थित स्टार्टअप नेस्टावे कंपनी ऑरम प्रॉपटेकने विकत घेतली आहे.
Ratan Tata
Ratan TataSakal
Updated on

Ratan Tata: भाड्याने फ्लॅट किंवा घर देणाऱ्या बेंगळुर स्थित स्टार्टअप नेस्टावे कंपनी ऑरम प्रॉपटेकने विकत घेतली आहे. 2019 मध्ये कंपनीचे मूल्यांकन 1800 कोटी रुपये होते परंतु कंपनी 90 कोटी रुपयांना विकली गेली आहे.

अवघ्या 3 वर्षातच कंपनीची वाढ झपाट्याने घसरली आहे. यामागे कोविड-19 हे एक मोठे कारण होते. कोरोना नंतर लोक गावाकडे किंवा स्वत:च्या घरी परतले आणि NestAway च्या व्यवसायाला मोठा फटका बसला.

Aurum Proptech Ltd ने NestAway Technologies Pvt Ltd या रतन टाटा यांची गुंतवणूक असलेल्या प्रोपटेक स्टार्टअप कंपनीचे 95% सवलतीत संपादन पूर्ण केले आहे. ऑरमने ही माहिती एक्सचेंज फाइलिंग दरम्यान शेअर केली. (Ratan Tata-Backed NestAway Sold To Aurum PropTech At Steep 95% Valuation Cut)

Bloomberg Quint Prime ने दिलेल्या वृत्तानुसार, ऑरम कंपनीने गेल्या वर्षीच हॅलो वर्ल्ड नावाची स्टार्टअप कंपनी विकत घेतली होती. ही कंपनी प्रथम नेस्टावेने विकत घेतली होती, नंतर ती ऑरमने ती विकत घेतली.

आता ऑरमने नेस्टावे कंपनी देखील विकत घेतली आहे. हॅलो वर्ल्डचे संस्थापक जितेंद्र जगदेव आणि इस्माईल खान आता अधिग्रहित नेस्टवेचे प्रमुख असतील. (NestAway Technologies Pvt.)

ऑरम आता Nestaway मध्ये आणखी 30 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. ऑरमने निवेदन जारी करून याबाबत माहिती दिली आहे.

नेस्टवेची स्थापना 2015 मध्ये अमरेंद्र साहू, दीपक धर, स्मृती परिदा यांनी केली होती. या कंपनीला 2019 मध्ये शेवटची गुंतवणूक मिळाली होती. तेव्हा त्याचे मूल्यांकन 22.5 दशलक्ष डॉलर्स होते, जे आजच्या रुपया नुसार 1854 कोटी रुपये होते.

Ratan Tata
स्वत:ची हौस कर्मचाऱ्यांसाठी पाऊस... 7 महिने कर्मचाऱ्यांचा पगार थकवून मालकानं चैनीसाठी उडवले 280 कोटी

कोविड-19 महामारीच्या काळात घरून काम करून घरी परतणाऱ्या लोकांमुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला. (Aurum PropTech Ltd.)

NestAway ची सुरुवात 2015 मध्ये झाली आणि प्लॅटफॉर्मने टायगर ग्लोबल आणि UC-RNT फंड सारख्या आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून 900 कोटी रुपये जमा केले.

कोविड-19 पूर्वी, त्यांच्या वेबसाइटवर 50,000 मालमत्ता होत्या आणि कंपनीने एका वर्षात 100 कोटींचा महसूलही कमावला होता. कोराना नंतर मालमत्ता 18,000 वर आल्या आणि महसूल 30 कोटींवर आला.

Ratan Tata
Self Respect चा प्रवास दूराग्रहाकडे नको

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.