Ratan Tata: ''मला तुमच्या मदतीची गरज'', रतन टाटांनी कोणासाठी मागितली मदत?

Ratan Tata: प्राण्यांना मदत करण्यात आघाडीवर असलेले उद्योगपती रतन टाटा आता एका श्वानाच्या उपचारासाठी मदत मागत आहेत. त्यांनी लिहिले की, 'मला तुझी मदत हवी आहे.' जखमी प्राण्यावर मुंबईतील स्मॉल ॲनिमल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
Ratan Tata
Ratan TataSakal
Updated on

Ratan Tata: प्राण्यांना मदत करण्यात आघाडीवर असलेले उद्योगपती रतन टाटा आता एका श्वानाच्या उपचारासाठी मदत मागत आहेत. त्यांनी लिहिले की, 'मला तुमची मदत हवी आहे.' जखमी प्राण्यावर मुंबईतील स्मॉल ॲनिमल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. जखमी श्वान रक्तदात्याच्या शोधात आहे. यासंबंधीची माहिती रतन टाटा यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेअर केली आहे.

पशु रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना 7 महिन्यांच्या श्वानासाठी रक्ताची गरज असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. ही पोस्ट शेअर केल्यापासून व्हायरल झाली आहे आणि आतापर्यंत सुमारे 5 लाख लाईक्स मिळाले आहेत आणि आकडे वेगाने वाढत आहेत. याशिवाय, युजर देखील ते वेगाने शेअर करत आहेत.

इंस्टा पोस्टनुसार, 'या 7 महिन्यांच्या श्वानाला हॉस्पिटलमध्ये रक्ताची गरज आहे. त्याला ताप आणि जीवघेणा ॲनिमिया झाला आहे. रक्तदान करणाऱ्या श्वानालाही काही आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. तो वैद्यकीयदृष्ट्या निरोगी असावा आणि त्याचे वय 1 ते 8 वर्षांच्या दरम्यान असावे, त्याचे वजन सुमारे 25 किलो किंवा त्याहून अधिक असावे, त्याचे संपूर्ण लसीकरण झाले असावे, त्याला कोणताही मोठा आजार नसावा. या अटी पूर्ण करणारे श्वान रक्तदान करू शकतात.

Ratan Tata
Inequality India: भारतात 85 टक्के अब्जाधीश उच्च जातीतील; अनुसूचित जमातीतील एकही व्यक्ती नाही, काय आहे अहवालात?

या पोस्टमध्ये रतन टाटा यांनी श्वानासाठी मुंबईतील लोकांकडून मदत मागितली आहे. तसेच, एक मोबाईल क्रमांक (7021850400) देखील पोस्टमध्ये दिलेला आहे. रतन टाटा यांच्या या पोस्टवर कमेंट करून यूजर्स त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करत आहेत. अनेकांनी या नंबरवर कॉल करून मदतीचा प्रस्ताव दिल्याचे या पोस्टमधील कमेंट्सवरून समोर आले आहे. मात्र, त्याला रक्तदाता सापडला आहे की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही.

Ratan Tata
Quant MF: क्वांट म्युच्युअल फंडात पैसे गुंतवलेत; SIP सुरू ठेवावी की फंडातून बाहेर पडावे? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला

प्राण्यांच्या उपचारासाठी त्यांनी मुंबईत रुग्णालय बांधले आहे. हे रुग्णालय 24 तास सुरू असते. या रुग्णालयात श्वान, मांजर, ससे आदी प्राण्यांवर उपचार केले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.