Ratan Tata: 'आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही'; असं का म्हणाले होते रतन टाटा?

Ratan Tata: काही वर्षांपूर्वी रतन टाटा यांनी देशाला उद्योगपती आणि व्यापारी यांच्यातील फरक समजावून सांगितला होता. रतन टाटा म्हणाले होते की, आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही, त्यामुळे आमच्यासाठी नफा महत्त्वाचा नाही, देश आणि समाजाचे कल्याण आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.
Ratan Tata
Ratan TataSakal
Updated on

Ratan Tata: काही वर्षांपूर्वी रतन टाटा यांनी देशाला उद्योगपती आणि व्यापारी यांच्यातील फरक समजावून सांगितला होता. रतन टाटा म्हणाले होते की, आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही, त्यामुळे आमच्यासाठी नफा महत्त्वाचा नाही, देश आणि समाजाचे कल्याण आमच्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे. 'आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही, असं रतन टाटा म्हणाले होते.

रतन टाटा यांच्या निधनामुळे देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांना जवळून ओळखणाऱ्या अनेकांनी त्यांच्या साध्या व्यक्तिमत्त्वाबद्दल मत व्यक्त केले. रतन टाटा यांनी छोट्या नफ्याऐवजी मोठ्या व्हिजनवर काम केले. रतन टाटा एकदा म्हणाले होते की, आम्ही उद्योगपती आहोत, व्यापारी नाही, आम्हाला असे निर्णय घ्यावे लागतील जे येत्या काळात देश आणि समाजासाठी फायदेशीर ठरतील, व्यावसायिकांप्रमाणे छोट्या नफ्याकडे आम्ही पाहत नाही.

Ratan Tata
Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

1981 मध्ये टाटा इंडस्ट्रीजचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उच्च-तंत्रज्ञान व्यवसायात एक धोरणात्मक आराखडा तयार करून मोठे बदल सुरू केले. रतन टाटा हे व्यवसायात जोखीम घेण्यापासून कधीही मागे हटले नाही. त्यांनी तरुण उद्योजकांना जोखीम पत्करायला शिकवली. रतन टाटा यांनी अनेक जागतिक कंपन्यांचे अधिग्रहन केले.

Ratan Tata
Ratan Tata: रतन टाटांची 5 मोठी कामे जी देशातील प्रत्येक नागरिकाला कायम स्मरणात राहतील

प्रत्येक भारतीयांचे कारचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रतन टाटा यांनी 2008 मध्ये नॅनो कार लॉन्च केली. त्यांना या डीलमध्ये नफा दिसला नाही, कारण सर्वसामान्यांसाठी परवडणारी कार बनवणे हा त्याचा उद्देश होता. रतन टाटा यांच्याबद्दल आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे ते असे उद्योगपती होते ज्यांनी त्यांच्या व्यवसायातील उत्पन्नाच्या 60 टक्क्यांहून अधिक पैसा टाटा ट्रस्टच्या माध्यमातून दान केला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.