Ratan Tata Passed Away: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी घेतला अखेरचा श्वास; भारतीय उद्योगाचा महामेरु हरपला

Ratan Tata Passed Away: टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांना मुंबईतील रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. 86 वर्षीय रतन टाटा हे गेल्या काही दिवसात हॉस्पिटलला तपासणीसाठी जात होते
Ratan Tata Passed Away
Ratan Tata Passed AwaySakal
Updated on

Ratan Tata Passed Away: भारतीय उद्योग क्षेत्रातील सर्वात ज्येष्ठ आणि ऋषीतुल्य व्यक्तिमत्व टाटा उद्योग समूहाचे मानद अध्यक्ष रतन नवल टाटा (वय ८६) यांचे आज रात्री मुंबईतील ब्रिच कँडी रुग्णालयात वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण उद्योग क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे. टाटा सन्स चे अध्यक्ष एन. चंद्रसेकरन यांनी यासंदर्भात एक पत्रक प्रसिद्धीला देऊन ही माहिती दिली आहे.

रतन टाटा गेले काही दिवस आजारी होते. काही दिवसांपूर्वी देखील त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आपण नियमित तपासण्या आणि चाचण्यांसाठी रुग्णालयात दाखल झाल्याचे स्पष्टीकरणही त्यांच्यातर्फे देण्यात आले होते. त्यामुळे त्यांची तब्येत व्यवस्थित असल्याचे मानले जात होते. मात्र ते समाधान अल्पजीवीच ठरले. आज पुन्हा त्यांना अत्यवस्थ अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची तब्येत सुधारावी म्हणून डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र ते अयशस्वी ठरले आणि रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

जमशेदजी टाटा यांनी स्थापन केलेल्या टाटा समूहाला रतन टाटा यांनी आज देशातील आणि जगातील अग्रगण्य उद्योगसमूह बनवले. अब्जावधी डॉलर मूल्य असलेल्या टाटा समूहाचे ते १९९१ मध्ये अध्यक्ष झाल्यानंतर २०१२ पर्यंत ते त्या पदावर होते. या काळात त्यांनी टाटा समूहातील सर्वच कंपन्यांना वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले.

१९९६ मध्ये त्यांनी टाटांची दूरसंचार कंपनी टाटा टेलीसर्विसेस ची स्थापना केली. तर सन २००४ मध्ये आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी टीसीएस चा आयपीओ देखील त्यांनी बाजारात आणला. २०१२ मध्ये समूहाचे अध्यक्षपद सोडल्यानंतर ते टाटा ग्रुपचे मानद अध्यक्ष म्हणून मार्गदर्शनाचे आणि देखरेखीचे काम करीत राहिले. अर्थात तरीही टाटा ग्रुपच्या कंपन्यांची घोडदौड तशीच सुरू राहील.

व्यवसाय करताना म्हणजेच नफा मिळवतानाही नीतिमूल्य, सामाजिक बांधिलकी व गुणवत्ता यांची कास न सोडण्याचे टाटा समूहाचे तत्व त्यांनीही शेवटपर्यंत पाळले होते. त्याची अनेक उदाहरणे समाज माध्यमांवरही वारंवार चर्चिली जात होती. २००८ मध्ये मुंबईवर कसाबने केलेल्या अतिरेकी हल्ल्यात टाटा ग्रुपच्या कुलाब्यातील ताजमहाल हॉटेलची मोठी हानी झाली.

तेथे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी देखील झाली. त्यानंतरही टाटा समूहाने ते सर्व हॉटेल पुन्हा पहिल्यासारखेच तयार केले. त्याचप्रमाणे या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना, तसेच जखमींनाही त्यांनी वाऱ्यावर न सोडता त्यांची पूर्ण वैद्यकीय जबाबदारी उचलली होती.

देशाकडून पैसा कमवत असताना आपण देशाचे, समाजाचेही फार मोठे देणे लागतो या विचारांनुसार रतन टाटा यांनी समाजसेवेलाही वाहून घेतले होते. शिक्षण, आरोग्य क्षेत्र या क्षेत्रातही त्यांनी समाजसेवेचे मोठे काम केले होते. टाटा कंपन्यांच्या सीएसआर योजनांमधून राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचा फायदा देशातील लक्षावधी गरीब लोकांना झाला..

Ratan Tata Passed Away
Stock Market: RBIचा एक निर्णय अन् शेअर बाजार तुफान तेजीत; सेन्सेक्स 600 अंकांनी वधारला, कोणते 10 शेअर्स वाढले?

त्यांच्याच नैतिक मूल्यांवर वाटचाल करू - एन. चंद्रसेकरन

रतन टाटा या असामान्य गुणवत्तेच्या उद्योग क्षेत्रातील नेत्यामुळे केवळ टाटा उद्योग समूहाचे नव्हे तर देशातील संपूर्ण उद्योग क्षेत्राचेच भवितव्य बदलले. टाटा ग्रुप साठी रतन टाटा हे अध्यक्ष पदापेक्षा मला स्वतःसह सर्वांनाच मार्गदर्शक, मित्र, शिक्षक अशा वेगवेगळ्या भूमिकेत आदर्शवत होते.

Ratan Tata Passed Away
RBI MPC Meeting: गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी घेतला मोठा निर्णय; तुमचा EMI कमी झाला का?

आपल्या स्वतःच्या वर्तनातून त्यांनी सामाजिक व आर्थिक जीवनातील अनेक उदाहरणे घालून दिली होती. कष्ट, प्रामाणिकपणा, नवकल्पना यांच्या प्रति रतन टाटा यांची बांधिलकी दृढ होती. त्यांनी घालून दिलेल्या नैतिक मूल्ंयावर टाटा समूह यापुढे देखील वाटचाल करेल, अशी प्रतिक्रिया एन. चंद्रसेकरन यांनी पत्रकात व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.