Ratan Tata: टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांचे नुकतेच मुंबईत निधन झाले. त्यांनी सुमारे 7,900 कोटी रुपयांची संपत्ती मागे सोडली आहे. त्यांनी त्यांचे जवळचे वकील मित्र डेरियस खंबाटा आणि सहकारी मेहली मिस्त्री यांना त्यांच्या मृत्यूपत्राची जबाबदारी दिली आहे. शिरीन आणि डायना जीजीभॉय यांनाही नामांकित केले आहे.
रतन टाटा यांचे 9 ऑक्टोबर रोजी वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले. त्यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष बनले आहेत. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी, टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66% हिस्सा आहे.