Ratan Tata: 'प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे...', रतन टाटांनी माजी पंतप्रधानांना लिहिलेले पत्र व्हायरल; काय आहे पत्रात?

Ratan Tata Letter to Former PM: RPG समूहाचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी देशाचे दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे पत्र शेअर केले आहे. रतन टाटा यांनी 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना हे पत्र लिहिले होते.
Ratan Tata's 1996 Letter To Narasimha Rao
Ratan Tata's 1996 Letter To Narasimha RaoSakal
Updated on

Ratan Tata Viral Letter: RPG समूहाचे अध्यक्ष हर्ष गोएंका यांनी देशाचे दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे पत्र शेअर केले आहे. रतन टाटा यांनी 1996 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना हे पत्र लिहिले होते.

या पत्रात त्यांनी नरसिंह राव यांच्या भारतातील आर्थिक सुधारणा सुरू करण्याच्या कामगिरीबद्दल आदर व्यक्त केला. 1996 मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा चेहरामोहरा बदलून तिला सुधारणेच्या मार्गावर नेण्यासाठी माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतीय आर्थिक सुधारणांचे जनक देखील म्हटले जाते.

भारताला जागतिक समुदायाचा भाग बनवल्याबद्दल माजी पंतप्रधानांचे कौतुक करताना रतन टाटा यांनी लिहिले, "प्रत्येक भारतीय तुमचा ऋणी आहे." भारताच्या प्रगतीसाठी रतन टाटा यांची बांधिलकी या पत्रातून दिसून येते. हर्ष गोयंका यांनी हे पत्र शेअर करत म्हटले आहे की, एका सुंदर व्यक्तीचे सुंदर हस्ताक्षर.

Ratan Tata's 1996 Letter To Narasimha Rao
Noel Tata: टाटा ट्रस्टचे नवे अध्यक्ष नोएल टाटा भारताचे नागरिक नाहीत; कोणत्या देशाचे आहेत नागरिक?

रतन टाटा यांनी या पत्रात पुढे लिहिले आहे की, "मला वाटते की तुमची (नरसिंह राव) कामगिरी महत्त्वाची आहे आणि ती कधीही विसरता येणार नाही. या पत्राचा उद्देश फक्त तुम्हाला हे सांगणे आहे की, माझे विचार आणि शुभेच्छा नेहमीच तुमच्यासोबत आहेत." हे पत्र वैयक्तिक असल्याचे वर्णन केले आहे. हे पत्र 27 ऑगस्ट 1996 रोजी टाटा समूहाचे मुख्य कार्यालय असलेल्या बॉम्बे हाऊसमधील एका कागदावर लिहिले होते.

गेल्या आठवड्यात 9 ऑक्टोबर रोजी देशातील प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांचे निधन झाले. वयाच्या 86 व्या वर्षी त्यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. दोन दिवसांपूर्वी त्यांना आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

Ratan Tata's 1996 Letter To Narasimha Rao
Income Tax: करदात्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन ई-फायलिंग 3.0 पोर्टल होणार लॉन्च; कसा होणार फायदा?

मृत्यूच्या एक दिवस आधी रतन टाटा आयसीयूमध्ये दाखल असल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र टाटा यांनीच तो दावा खोडून काढला होता. रतन टाटा हे त्यांच्या साधेपणासाठी ओळखले जात होते. उदारीकरणाच्या कालखंडानंतर टाटा समूह आज ज्या उंचीवर पोहोचला आहे, त्या उंचीवर नेण्यात रतन टाटा यांचे मोठे योगदान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.