Raymond: रेमंडचे चेअरमन गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्यात घटस्फोटाचा वाद सुरू असून त्याचा परिणाम रेमंड कंपनीवर होत आहे. 13 नोव्हेंबरपासून कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने घसरण नोंदवली जात आहे.
यातच आता एका प्रॉक्सी सल्लागार फर्मने स्वतंत्र संचालकांना नवाज मोदींनी गौतम सिंघानिया यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्यास सांगितले आहे. कंपनीने पाच प्रश्नांची उत्तरे मागवली आहेत.
इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर अॅडव्हायझरी सर्व्हिसेस (IIAS) ने म्हटले आहे की, सिंघानिया आणि नवाज यांना तपासादरम्यान बोर्डापासून दूर ठेवावे. एवढ्या गंभीर आरोपावर सर्वजण गप्प असल्याचे त्यात म्हटले आहे.
नवाज मोदींनी रेमंडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया यांच्यावर घरगुती हिंसाचार आणि कंपनीच्या निधीचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.
IiAS ने पत्रात लिहिले आहे की बोर्डाच्या एका सदस्याने (नवाज मोदी) दुसर्या बोर्ड सदस्यावर (गौतम सिंघानिया) इतके गंभीर आणि घृणास्पद आरोप केले आहेत परंतु तरीही सर्वजण गप्प आहेत.
सल्लागार फर्मने पुढे लिहिले की या शांत राहण्याचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो असा विचार भागधारकांनी करावा असे कंपनीला वाटत नाही. सल्लागार कंपनीने पुढे सांगितले की, किमान स्वतंत्र संचालकांनी गुंतवणूकदार आणि इतर भागधारकांशी संवाद साधणे, त्यांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे.
'या' प्रश्नांची उत्तरे कंपनीने मागवली
1. कोणत्याही संचालकाने कंपनीच्या आचारसंहिता आणि नैतिक धोरणाचे उल्लंघन केले आहे का?
2. कंपनी किंवा तिच्या कोणत्याही संचालकांवर गुन्हेगारी स्वरुपाचे आरोप आहेत आहे का?
3. संचालकाचे काम कंपनीच्या ब्रँडशी सुसंगत आहे का? त्यांच्या कृती ब्रँडपासून वेगळ्या केल्या जाऊ शकतात का?
4. सीईओवर करण्यात आलेल्या आरोपात सत्यता असेल, तर पुढील त्रुटी टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील?
5. घटस्फोट आणि त्यांच्यावरील आरोपांमुळे सीएमडीचे लक्ष विचलित होईल का? तसे असल्यास, घटस्फोटाचा तोडगा निघेपर्यंतअंतरिम सीईओ असण्याने कंपनी चालविण्यात मदत होईल का?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.