Raymond Group: कंपन्यांच्या संचालक मंडळातून नवाज मोदींची हकालपट्टी; गौतम सिंघानियांवर केला आणखी एक आरोप

Raymond Group: रेमंड कंपनीचे अध्यक्ष गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाला आता वेग आला आहे. नवाज मोदी यांना रेमंड ग्रुपच्या तीन कंपन्यांच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे.
Raymond Group companies oust Nawaz Modi-Singhania from board amid divorce dispute
Raymond Group companies oust Nawaz Modi-Singhania from board amid divorce dispute Sakal
Updated on

Raymond Group: रेमंड कंपनीचे अध्यक्ष गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी सिंघानिया यांच्या घटस्फोटाच्या प्रकरणाला आता वेग आला आहे. नवाज मोदी यांना रेमंड ग्रुपच्या तीन कंपन्यांच्या संचालक मंडळातून काढून टाकण्यात आल्याचे वृत्त आहे. नवाज मोदी आणि गौतम सिंघानिया यांच्यातील तणाव वाढत असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट झाले आहे.

यापूर्वी, विभक्त झाल्यानंतर, नवाज मोदी यांनी घटस्फोटाच्या बदल्यात पती गौतम सिंघानिया यांच्याकडे संपत्तीतील 75 टक्के वाटा मागितला होता. त्यांनी आपली मुलगी निहारिका, निशा आणि स्वतःसाठी हा हिस्सा मागितला. यासाठी गौतम सिंघानिया तयार नव्हते.

नवाज मोदींनी पती गौतम सिंघानिया यांच्याकडे 75 टक्के संपत्तीची मागणी केली होती. नवाज मोदी म्हणाल्या की, गौतम सिंघानियाची संपत्ती सुमारे 1.4 अब्ज डॉलर्स (11,667 कोटी रुपये) आहे आणि त्यांची इच्छा आहे की त्यांच्या प्रत्येक मुलीला निहारिका आणि निशा यांना 25% संपत्ती मिळावी. त्याची रक्कम 5,83,4,00,00,000 रुपये आहे. गौतम सिंघानियाचे वडील विजयपत सिंघानिया यांचे मत आहे की संपत्तीपैकी 50 टक्के रक्कम त्यांना मिळायला हवी, असा खुलासा नवाज मोदींनी केला.

गौतम सिंघानिया हे सुमारे 11 हजार कोटी रुपयांच्या संपत्तीचे मालक आहेत. आणि गेल्या नोव्हेंबरमध्ये गौतम आणि नवाजने दोघे विभक्त झाल्याची माहिती सार्वजनिक केली होती.

Raymond Group companies oust Nawaz Modi-Singhania from board amid divorce dispute
Jobs In IT Sector: आयटी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीत फ्रेशर्ससाठी नोकरीची संधी; 6,000 कर्मचाऱ्यांची करणार भरती

इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, रेमंड ग्रुपने जे.के. इनव्हेस्टर (बॉम्बे), रेमंड कंझ्युमर केअर, स्मार्ट ॲडव्हायझरी आणि फिनसर्व्ह कंपन्यांनी नवाज मोदी यांना संचालक मंडळाच्या टीममधून काढून टाकले असून ही माहिती स्टॉक एक्सचेंजला कळवण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, नवाजने या कारवाईला विरोध केला असून आगामी काळात नवाज मोदी यासाठी कायदेशीर लढाईही लढू शकतात. आणि नवाज मोदी सिंघानिया यांनाही रेमंडच्या संचालक मंडळातून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे.

Raymond Group companies oust Nawaz Modi-Singhania from board amid divorce dispute
Uday Kotak: आरबीआयचा एक निर्णय अन् उदय कोटक यांचे 10,225 कोटी रुपयांचे नुकसान; काय आहे प्रकरण?

नवाज मोदींनी आणखी एक खुलासा केला होता. एका पार्टीत गौतम सिंघानिया यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप केला होता आणि गौतम यांनीही तिच्या मुलीवर हात उचलला होता. त्यादरम्यान नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांनी त्यांना वाचवले. मात्र, गौतम सिंघानिया यांनी या आरोपावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.