RBI Gold Reserve: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत 24 टन सोन्याचा साठा केला आहे. भू-राजकीय तणावादरम्यान अस्थिरता टाळण्यासाठी मध्यवर्ती बँक आपल्या रिझर्व्हमध्ये विविधता आणत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत यंदाच्या पहिल्या चार महिन्यांत जवळपास दीडपट सोन्याची खरेदी झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारी ते एप्रिल या काळात आरबीआयने सोन्याचा साठा 16 टनांनी वाढवला होता.
भारत हा सोन्याच्या सर्वात मोठ्या ग्राहकांपैकी एक आहे, परंतु देशाची मध्यवर्ती बँक क्वचितच सोन्याचा साठा जमा करण्यात एवढी सक्रिय असते. 1991 मध्ये, जेव्हा देशाला परकीय चलनाच्या संकटाचा सामना करावा लागला तेव्हा मध्यवर्ती बँकेने सोन्याच्या साठ्यातील काही भाग गहाण ठेवला होता. सरकारच्या या निर्णयावर जोरदार टीका झाली होती.
2022 मध्ये बँकेने बाजारातून भरपूर सोने खरेदी केले होते. गेल्या वर्षी 2023 मध्ये आरबीआयने कमी सोने खरेदी केले होते परंतु यावर्षी पुन्हा सोने खरेदीत वाढ झाली आहे.
एकूण परकीय चलनाच्या साठ्यात सोन्याचा वाटा डिसेंबर 2023 अखेर 7.75 टक्के होता, जो एप्रिल 2024 अखेर सुमारे 8.7 टक्के झाला. आरबीआयच्या अर्थतज्ज्ञांनी अर्थव्यवस्थेच्या स्थितीचे मूल्यांकन करताना म्हटले आहे की, वाढत्या जागतिक अनिश्चिततेमुळे उदयोन्मुख बाजारपेठांच्या मध्यवर्ती बँका मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करत आहेत. 2024 च्या पहिल्या तिमाहीत त्यांनी 290 टन सोने खरेदी केले. एकूण जागतिक सोन्याच्या मागणीपैकी हे प्रमाण एक चतुर्थांश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.