Kotak Mahindra Bank: कोटक महिंद्रा बँकेला मोठा झटका; आरबीआयने नवीन क्रेडिट कार्ड देण्यावर घातली बंदी, काय आहे कारण?

Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन किंवा मोबाईल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. याशिवाय आरबीआयने कोटक बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
RBI bars Kotak Bank from onboarding new online customers, issuing new credit cards
RBI bars Kotak Bank from onboarding new online customers, issuing new credit cards Sakal
Updated on

Kotak Mahindra Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा बँकेवर मोठी कारवाई केली आहे. RBI ने कोटक महिंद्रा बँकेला ऑनलाइन किंवा मोबाईल बँकिंग चॅनेलद्वारे नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली आहे. याशिवाय आरबीआयने कोटक बँकेचे नवीन क्रेडिट कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयने सांगितले की कोटक महिंद्रा बँक क्रेडिट कार्ड ग्राहकांसह त्यांच्या विद्यमान ग्राहकांना सर्व सेवा देणे सुरु ठेवणार आहे.

यासंदर्भात आरबीआयने एक निवेदन जारी केले आहे. यानुसार, 'भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकारांचा वापर करून, आज कोटक महिंद्रा बँक लिमिटेडला कामकाज बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये (i) नवीन ग्राहकांना त्यांच्या ऑनलाइन आणि मोबाइल बँकिंग चॅनेलद्वारे ऑनबोर्ड करणे आणि (ii) नवीन क्रेडिट कार्ड जारी करणे समाविष्ट आहे.

RBI bars Kotak Bank from onboarding new online customers, issuing new credit cards
Loan Fraud: देशातील सर्वात मोठ्या फायनान्समध्ये 150 कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

2022 आणि 2023 च्या तंत्रज्ञानाची तपासणी करून रिझर्व्ह बँकेने ही कारवाई केली आहे. आरबीआयला कोटक बँकेच्या आयटी प्रणालीमध्ये काही त्रुटी आढळल्या होत्या. यावर आरबीआयनेही उत्तर मागितले होते, मात्र उत्तर समाधानकारक न आल्याने कारवाई करण्यात आली आहे. पुरेशा आयटी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे, ग्राहकांना 2 वर्षांत अनेक वेळा समस्यांना सामोरे जावे लागले.

आयटीच्या तपासानंतर ही कारवाई करण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. या तपासणीत अतिशय गंभीर समस्या दिसून आल्या आहेत. बँकेच्या आयटी इन्व्हेंटरी मॅनेजमेंट, व्हेंडर रिस्क मॅनेजमेंट, यूजर ऍक्सेस मॅनेजमेंट, डेटा सिक्युरिटी आणि डेटा लीक रोखण्यासाठीच्या कामामध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत.

RBI bars Kotak Bank from onboarding new online customers, issuing new credit cards
Tesla Layoff: इलॉन मस्कचा मोठा निर्णय! टेस्लातील 6 हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

क्रेडिट कार्ड मार्केटमधील सुमारे 4 टक्के वाटा

देशातील एकूण क्रेडिट कार्ड मार्केटमध्ये बँकेचा वाटा सुमारे 4 टक्के आहे. कोटक महिंद्रा फायनान्सला 2003 मध्ये बँकिंग परवाना मिळाला होता. बँकेत रूपांतरित होणारी ही पहिली NBFC होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.