RBI Canceled License: रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेचा परवाना रद्द केला आहे. आरबीआयने नाशिक जिल्हा गिरणा सहकारी बँक लिमिटेडचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. याचे कारण बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही. याबाबतची माहिती आरबीआयने दिली आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एका निवेदनात म्हटले आहे की, परवाना रद्द केल्यामुळे, बँक बँकिंग व्यवसाय करु शकत नाही.
अनेक बँका बंद करण्याचा RBI चा विचार
सहकार आयुक्त आणि निबंधक, महाराष्ट्र यांना बँक बंद करण्याचे आदेश जारी करून बँकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून लिक्विडेशन केल्यावर, प्रत्येक ठेवीदाराला त्यांच्या ठेवींपैकी पाच लाख रुपयांपर्यंतच्या ठेव विमा दाव्याची रक्कम प्राप्त करण्याचा अधिकार असेल.
आरबीआयने आकडेवारी जाहीर केली
रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बँकेच्या आकडेवारीनुसार, 99.92 टक्के ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण रक्कम DICGC कडून मिळण्याचा अधिकार आहे.
डीआयसीजीसीने एकूण विमा उतरवलेल्या ठेवींपैकी 16.27 कोटी रुपये ठेवीदारांना आधीच दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की सहकारी बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईची क्षमता नाही आणि बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या तरतुदींचे पालन करण्यात बँक अपयशी ठरली आहे.
कपोल बँकेचा परवानाही रद्द करण्यात आला
अलीकडेच भारतीय रिझर्व्ह बँकने (RBI) मुंबईच्या 'द कपोल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड'चा परवाना रद्द केला आहे. रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की बँकेकडे पुरेसे भांडवल नाही आणि कमाईची क्षमता नाही, त्यामुळे आरबीआयने हा निर्णय घेतला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.