RBI Action: चार दिवसात दोन बँकांचे परवाने रद्द, RBIच्या आदेशानंतर ग्राहकांच्या पैशांचे काय होणार?

Rbi Cancels Bank Licence: रिझर्व्ह बँकेने बँकेचे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
RBI cancels license of UP-based Urban Co-operative Bank
RBI cancels license of UP-based Urban Co-operative Bank Sakal
Updated on

Rbi Cancels Bank Licence: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने उत्तर प्रदेश सहकारी बँक सीतापूरचा परवाना रद्द केला आहे. तसेच आजपासून बँकेचे कामकाज बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशानुसार ठेवीदारांना 5 लाखांपर्यंतची रक्कम मिळणार आहे.

बँकेची खराब आर्थिक स्थिती पाहता रिझर्व्ह बँकेने हा निर्णय घेतला आहे. परवाना रद्द करण्याचे आदेश जारी करताना बँकेकडे पुरेसे भांडवल नसल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी 4 डिसेंबर रोजी कोल्हापुरातील इचलकरंजी येथील शंकरराव पुजारी नूतन नागरी सहकारी बँक लिमिटेडचा परवाना आरबीआयने रद्द केला होता.

बँकेकडे पुरेसे भांडवल नाही, असे आरबीआयने म्हटले आहे

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकेचा परवाना रद्द करण्याचे कारण देताना बँकेकडे पुरेसे भांडवल आणि उत्पन्न नसल्याचे म्हटले आहे. बँकेने बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 56 सह कलम 11(1) आणि कलम 22(3)(d) च्या तरतुदींचे पालन केले नाही.

RBI cancels license of UP-based Urban Co-operative Bank
Dunzo Crisis: डन्झो कंपनी आर्थिक संकटात! कर्मचार्‍यांना पगार देण्यासाठीही पैसे नाहीत

बँकिंग व्यवसायावर बंदी

आरबीआयच्या म्हणण्यानुसार, बँकेला बँकिंग व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होईल. आपल्या निवेदनात, आरबीआयने म्हटले आहे की परवाना रद्द केल्यानंतर, 'बँकिंग' व्यवसाय सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये ठेवी स्वीकारणे आणि ठेवींची परतफेड करणे समाविष्ट आहे.

RBI cancels license of UP-based Urban Co-operative Bank
Ethanol Production: उसापासून इथेनॉल बनवण्यावर सरकारने घातली बंदी; काय आहे कारण?

बँक ग्राहकांना ठेवीदार विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC) कडून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींवर विमा संरक्षणाची सुविधा मिळते.

प्रत्येक ठेवीदार, डीआयसीजीसी कायदा, 1961 च्या तरतुदींनुसार, ठेव विम्यामधून 5,00,000/- (रुपये फक्त पाच लाख) च्या आर्थिक मर्यादेपर्यंतच्या ठेवींच्या संदर्भात ठेव विम्याचा दावा करु शकतो.

बँकेने सादर केलेल्या आकडेवारीनुसार, 98.32% ठेवीदारांना त्यांच्या संपूर्ण ठेवी DICGC कडून प्राप्त करण्याचा अधिकार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.