RBI On Interest Rates: महागडे कर्ज आणि ईएमआयमधून सध्या कोणताही दिलासा मिळणार नसल्याचे मत रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी व्यक्त केले आहे. आर्थिक वातावरणातील अस्थिरता आणि महागाई वाढीचा दर 5 टक्क्यांच्या जवळ असल्याने व्याजदरात कपात करण्याबाबत बोलणे घाईचे ठरेल असे वक्तव्य शक्तीकांत दास यांनी केले आहे.
CNBC-TV18 ला दिलेल्या मुलाखतीत शक्तीकांत दास म्हणाले, भारतासह संपूर्ण जगाची आर्थिक परिस्थिती सध्या अनिश्चित आहे. अशा स्थितीत व्याजदर कपातीबाबत बोलणे योग्य ठरणार नाही. किरकोळ महागाई वाढीचा दर अजूनही 5 टक्क्यांच्या जवळ असल्याचे ते म्हणाले. आणि जे सर्वेक्षण समोर येत आहे त्यानुसार महागाईचा दर 5 टक्क्यांच्या जवळ राहू शकतो.
अशा स्थितीत व्याजदर कपातीबाबत बोलणे घाईचे ठरेल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले, मी कोणतेही चुकीचे मार्गदर्शन करणार नाही ज्यामुळे बाजारातील गुंतवणूकदार चुकीच्या ट्रेनने प्रवास करू लागतील.
आरबीआयच्या या भूमिकेबाबत गव्हर्नर म्हणाले, यामागे एक कारण आहे. आरबीआयने महागाई वाढीचा दर 4 टक्क्यांवर आणण्याचे लक्ष्य ठेवले असून सध्या महागाईचा दर 5 टक्क्यांच्या जवळ आहे. ते म्हणाले की आम्हाला आशा आहे की दर कमी होईल.
पण महागाई कमी होण्याचा वेग खूपच कमी आहे. शक्तीकांता दास म्हणाले, महागाईचा दर लवकर लक्ष्याच्या जवळ आणायचा असेल तर चलनविषयक धोरण अधिक कठोर करावे लागेल. आरबीआय गव्हर्नर म्हणाले, आम्ही हे केले नाही कारण आम्हाला वाढ आणि महागाई यांच्यात संतुलन राखायचे आहे आणि आम्ही हळूहळू आमच्या ध्येयाकडे जात आहोत.
RBI ने 7 जून 2024 रोजी जारी केलेल्या पतधोरणात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला होता आणि रेपो दर 6.50 टक्के ठेवण्यात आला आहे. 12 जुलै रोजी किरकोळ महागाईचे आकडे जाहीर केले जातील, त्यावर बाजाराची नजर असेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.