RBI: मान्सून, कृषी क्षेत्र, महागाई आणि बँकांवर RBI गव्हर्नर यांचे मोठे वक्तव्य, काय म्हणाले?

RBI: खाद्यपदार्थांची महागाई हा अजूनही चिंतेचा विषय आहे.
rbi governor shaktikanta das on monsoon inflation banks agriculture
rbi governor shaktikanta das on monsoon inflation banks agriculture Sakal
Updated on

RBI: FICCI च्या बँकिंग कॉन्फरन्स FIBAC 2023 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) चे गव्हर्नर शक्तीकांत दास म्हणाले की जगभरात आर्थिक मंदीचे संकट आहे. 2019 पासून जग सतत संकटाचा सामना करत आहे.

त्यामुळे किरकोळ महागाई कमी करण्यासाठी अनेक पावले उचलण्यात आली आहेत. महागाई कमी करण्याला प्राधान्य दिले जात आहे. चलनविषयक धोरणात महागाई नियंत्रणाला प्राधान्य दिले जात आहे. खाद्यपदार्थांची महागाई हा अजूनही चिंतेचा विषय आहे.

दास पुढे म्हणाले की, अमेरिकन बँकेने दर बदललेले नाहीत. बँकिंग व्यवस्थेशी संबंधित जोखमींवर RBI बारीक नजर ठेवत आहे. सध्या भारतीय रुपयामध्ये कमी चढउतार होत आहेत, म्हणजेच तो स्थिर आहे.

कृषी क्षेत्रात सुधारणा आवश्यक

कृषी क्षेत्रात सुधारणांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. मान्सून कमी असूनही कृषी क्षेत्रात स्थिरता आहे. खासगी क्षेत्राला कृषी क्षेत्रात गुंतवणूक करण्याची संधी आहे.

बँकांनी जास्त कर्ज वाटप करू नये

कर्जाची मुदत काही कर्जदारांनी वाढवली आहे. बँका आणि एनबीएफसींनी जास्त कर्जे वितरित करू नयेत. डिजिटल तंत्रज्ञान हे आर्थिक सेवांचे माध्यम आहे. NBFC ने बँक कर्जावरील अवलंबित्व कमी केले पाहिजे. सर्व पातळ्यांवर पत वाढ राखणे महत्त्वाचे आहे.

RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:

  • कर्जवाढीचा धोका टाळण्यासाठी असुरक्षित कर्जावर कडक धोरण ठेवले आहे

  • असुरक्षित कर्जातून गृहनिर्माण, वाहन आणि लघुउद्योजकांची कर्जे या नियमातून बाहेर ठेवण्यात आली आहेत

  • आर्थिक क्षेत्र नेहमीच मजबूत राहणे खूप महत्वाचे आहे

  • NBFC देखील बँकिंग प्रणालीनुसार काम करत आहेत.

  • सध्या बँकिंग व्यवस्थेत कोणताही नवीन ताण निर्माण झालेला दिसत नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.