Shaktikanta Das: आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा जगभरात डंका; सलग दुसऱ्या वर्षी बनले सर्वोच्च केंद्रीय बँकर

Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेच्या 'ग्लोबल फायनान्स' मासिकाने जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले आहे.
RBI Governor Shaktikanta Das
RBI Governor Shaktikanta Das Sakal
Updated on

Shaktikanta Das: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांना सलग दुसऱ्या वर्षी अमेरिकेच्या 'ग्लोबल फायनान्स' मासिकाने जागतिक स्तरावर सर्वोच्च केंद्रीय बँकर म्हणून स्थान दिले आहे. आरबीआयने एका पोस्टमध्ये म्हटले आहे दास यांना तीन सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या यादीत शीर्षस्थानी ठेवण्यात आले आहे, त्यांना 'A+' रेटिंग देण्यात आले आहे.

A+ रेटिंग मिळालेल्या तीन सेंट्रल बँकेच्या गव्हर्नरांच्या यादीत शक्तीकांता दास अव्वल स्थानावर आहेत. ग्लोबल फायनान्स मासिकानुसार, महागाई नियंत्रण, आर्थिक वाढीचे लक्ष्य, चलन स्थिरता आणि व्याजदर व्यवस्थापनात यश मिळवण्यासाठी A ते F च्या स्केलवर ग्रेड दिले जातात.

उत्कृष्ट कामगिरीसाठी 'A' श्रेणी दिली जाते, तर 'F' पूर्ण अपयशासाठी दिली जाते. डेन्मार्कचे ख्रिश्चन केटल थॉमसेन, भारताचे शक्तिकांता दास आणि स्वित्झर्लंडचे थॉमस जॉर्डन यांना सेंट्रल बँकर्सच्या 'A+' श्रेणीत स्थान मिळाले आहे.

RBI Governor Shaktikanta Das
Salary Package: 9,00,000 रुपये वार्षिक पगार; कंपनीची फ्रेशर्सना ऑफर, आयटी कंपन्या एवढा पगार का देत आहेत?

1994 पासून दरवर्षी, ग्लोबल फायनान्स मासिक जगातील 101 देश आणि प्रदेशांच्या मध्यवर्ती बँकांच्या प्रमुखांचे मूल्यांकन करते. यामध्ये युरोपियन युनियन आणि काही इतर प्रादेशिक मध्यवर्ती बँकांचाही समावेश आहे. कोणते गव्हर्नर त्यांच्या कामात चांगल्या पद्धती, नवीन कल्पनांचा विचार करतात या गोष्टींचा विचार या निवडीत केला जातो.

याशिवाय, दास यांची यापूर्वीच लंडनमधील सेंट्रल बँकिंग अवॉर्ड्स 2023 मध्ये 'गव्हर्नर ऑफ द इयर' म्हणून निवड झाली आहे, ज्यामुळे जगातील सर्वात यशस्वी केंद्रीय बँक प्रमुखांपैकी एक म्हणून त्यांची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे.

RBI Governor Shaktikanta Das
Gold Rate: सोन्याने घेतली मोठी झेप; एकाच दिवसात मोडला महिन्याचा विक्रम, चांदीचे भावही भिडले गगनाला

पंतप्रधान मोदींनी दास यांचे अभिनंदन केले

सर्वोच्च रेटिंग मिळाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी RBI गव्हर्नर शक्तीकांता दास यांचे अभिनंदन केले आणि त्यांच्या नेतृत्वाची प्रशंसा केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.